
गोंदिया,दि.१०ः-राज्यातील विधानसभा निवडणुकांची बिगुल पुढील आठवड्यात वाजण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आज महायुती सरकारच्या व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाची शेवटची बैठक आज संपन्न झाली. याबैठकीत जवळपास 80 निर्णय घेण्यात आले असून यामध्ये राज्यातील ज्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, उपसभापतींच्या निवडणूकी येत्या महिन्यात होऊ घातलेल्या होत्या.त्या सर्व पदाधिकारी निवडणूकीस मुदतवाढ देण्याचा निर्णय ग्राम विकास विभागाच्या वतीने घेण्यात आलेला आहे.या निर्णयामुळे गोंदिया,भंडारा जिल्हा परिषदांसह पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींच्या निवडणूका आता विधानसभा आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबर किंवा जानेवारीत होण्याची शक्यता आहे.