जिद्द आणि चिकाटीची भुक उराशी बाळगून ध्येय प्राप्ती करावी:-इंजि यशवंत गणविर

0
48

अर्जुनी मोरगाव,दि.१२ः-तालुक्यातील गौरनगर येथे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने झाडीपट्टीत गाजलेल्या भुक या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.या नाट्य प्रयोगाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या शुभहस्ते, माजी सभापती उमाकांत ढेंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
उद्घाटनिय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,आजचे युग हे स्पर्धेचे तंत्रज्ञानाचे विज्ञानाचे युग आहे आणि या युगात टिकून राहण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे.शिक्षणाच्या प्रवाहातुनच आपण सामाजिक, आर्थिक व राजकीय क्रांती घडवून आणु शकतो व स्वतः ला सक्षम बनवु शकतो.शिक्षणामुळे मानवी जीवनमान बदलते शैक्षणिक जीवनात आपल्याला समाजकारण राजकारण व अर्थशास्त्राचे ज्ञान मिळत असते.ज्ञानप्राप्तीमुळे आपली वैचारिक पातळी वाढते आणि वैचारिक क्रांतीची सुरुवात होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,आज या बंगाली भाषिक गावात झाडीपट्टीच्या रंगभूमीवर गाजलेल्या भुक या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले,नाटक अतिशय सुंदर आहे, भुक म्हणजे काय? भुक म्हणजे निव्वळ पोट भरण्यासाठी खाणे नव्हे तर जिद्द आणि चिकाटीची भुक उराशी बाळगा, भविष्यात मी डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, एखाद्या प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक होण्याची भुक आपल्यात रुजवा.त्या पेक्षाही मी या देशाचा सुज्ञ,तज्ञ, सुसंस्कृत सृजनशील व कर्तव्यदक्ष नागरिक घडणार व आपल्या गावाचे, तालुक्याचे,जिल्ह्याचे नावलौकिक करण्याची भुक उराशी बाळगा.असे आवाहन विचारमंचावरून केले.
या कार्यक्रमाला जि.प.सदस्या जयश्री देशमुख, अनिल देशमुख, पंचायत समिती सदस्य डॉ नाजुक कुंभरे, मुरलीधर ठाकरे, नाट्य दिग्दर्शक युवराज प्रधान, नाकाडे धान्य व्यापारी, मंडळाचे अध्यक्ष सचिव सर्व‌ सदस्य व परीसरातील नाट्य प्रेमी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.