आदर्श तेली समाज सेवा समितीच्यावतीने रविवारला कोजागिरीचे आयोजन

0
118

गोंदिया,दि.१८ः आदर्श तेली समाज सेवा समिती,गोंदियाच्यावतीने येत्या २० आॅक्टोंबरला सायंकाळ ६ ते १० वाजेपर्यंत शरद पुर्णिमा (कोजागिरी)कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमांचा शुभारंभ नृत्यस्पर्धा,गायनस्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,एकांकिका,संताजीची वेशभुषा,चित्रकला स्पर्धेने करण्यात येणार आहे.महिलाकरीता रास गरबा,फॅन्सी ड्रेस स्पर्धा,एच्छीक लावणी,रांगोळी स्पर्धा आदीचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श तेली समाज सेवा समितीचे अध्यक्ष मुकेश पाटील राहणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ता भरत वाघमारे,उमेंद्र भेलावे,सुनिल लांजेवार,प्रा.माधुरीताई नासरे,लखन धावडे,किशोर भेलावे,महिला प्रमुख पायल भेलावे,युवा प्रमुख माधव भेलावे,सचिव विजय सुपारे,कोषाध्यक्ष वसंत निखाडे,कार्याध्यक्ष भरत वाघमारे यांच्यासह कार्यकारीणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.