गोंदिया दि. 19-जलशक्ती अभियानाचे उदिष्टे पावसाचे पाणी वाचवणे आणि पाण्याच्या संर्वधनसाठी लोकांना पुढे आणणे असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी म्हटले आहे.यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत गावांना पाणी मिळ्ण्याचा फायदा होणार आहे. अभियानाला ‘कॅच द रेन कॅम्पेन’ नाव देण्यात आले आहे.
‘कॅच द रेन कॅम्पेन’ या अभियानामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणात सामील करण्यात येणार असून यामुळे एकप्रकारची जलशक्ती अभियानाची चळवळ उभी केली जाणार आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे, लोकांमध्ये पावसाच्या पाण्याबाबत जागरुकता तयार करणे आणि पाण्याचे संवर्धन करत या मोहीमेसाठी लोकांना पुढे करणे हे ह्या अभियानाचे मुख्य हेतू असल्याचे डॉ.नितीन वानखेडे यांनी म्हटले आहे.
जलशक्ती अभियान “कॅच द रेन” यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थातील जागेत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याच्या सुचना वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आल्या आहे.
दि. 08 ऑक्टोंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र खमारीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शहजादा राजा यांच्या कल्पक विचारातुन पीएचसी खमारी येथे सर्व कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.एकूण 17 झाडे योग्य पद्धतीने लावली.यासोबतच ग्लोबल वॉर्मिंग, झाडांचे महत्त्व याविषयी लोकांना संदेश दिला असल्याची माहीती डॉ.शहजादा राजा यांनी याप्रसंगी दिली आहे. लोकांनी आपल्याला जगण्यासाठी आणि भावी पिढ्यांच्या अस्तित्वासाठी झाडे लावा- झाडे जगवा हि सामुहीक चळवळ करणे गरजेचे असल्याचे सुद्धा त्यांनी म्हटले आहे. डॉ.राजा यांनी या वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व कर्मचारी वर्गाचे आभार मानले आहे.