कुरखेडाचे तत्कालीन उप अधीक्षक प्रकाश कुरवाडे यांनी केलेली देसाईगंज सिटी सर्व्हे चौकशी नोंदवही तब्बल तीन वर्षांपासून अपुर्णच

0
590

उप अधीक्षक भुमी अभिलेख विभागाने दिले नोटीस

देसाईगंज दि.२४-सध्या लावणी येथे स्थानांतरित झालेले व गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडाचे तत्कालीन उप अधीक्षक प्रकाश कुरवाडे यांनी मौजा नैनपुर गावठाणची चौकशी नोंदवही क्रमांक १२ व शिट क्रमांक १० चे सिटी सर्व्हेचे अभिलेख दि.१४/०९/२०२१ पासुन देण्यात आले होते.मात्र, देसाईगंज सिटी सर्व्हेची चौकशी नोंदवही व शिट तब्बल तीन वर्षांपासून अद्यापही अपुर्णच ठेवले असल्याचे प्रभारी जिल्हा अधीक्षक श्रीमती नंदा आंबेकर व तालुका भुमी अभिलेख उप अधीक्षक अमोल बुद्धे यांनी दि ११/१०२०२४ ला बजावलेल्या नोटिसीवरुन उघडकीस आले असल्याने भुमी अभिलेख विभागात खळबळ माजली आहे.
जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख गडचिरोली यांनी कुरखेडा येथील तत्कालीन उप अधीक्षक प्रकाश कुरवाडे या़ंना मौजा नैनपूर येथील गावठाण कडील चौकशी नोंदवही क्रमांक १२ शिट क्रमांक १० हे अभिलेख दिनांक १४/०९/२०२१ ला चौकशी कामी वाटप करण्यात आले. सध्या प्रशासकीय कारणास्तव प्रकाश कुरवाडे यांचे स्थानांतरण भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुका भुमी अभिलेख कार्यालयात झाले असून देसाईगंज शहरातील सिटी सर्व्हेचे दिलेले काम त्यांनी दि.२९/७/२०२४ ला तालुका भुमी अभिलेख कार्यालयात जमा केले. मात्र, सदर चौकशी नोंद वही व शिटमधील घेतलेल्या नोंद मध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आले असुन अपूर्ण असल्याचे कार्यालयाने बजावलेल्या नोटिसीवरुन उघडकीस आले आहे.
तत्कालीन उप अधीक्षक प्रकाश कुरवाडे यांनी मौजा नैनपुर गावठाणची चौकशी नोंदवही व शिट क्रमांक दि.२९/७/२०२४ ला तालुका भुमी अभिलेख कार्यालय देसाईगंज या़च्याकडे जमा केल्यानंतर देसाईगंज शहरातील सिटी सर्व्हेचे चौकशी नोंदवही क्रमांक १२ चे अवलोकन केले असता चालते क्रमांक. २८.१४४,१६७.१८३.१८४,१८५,२०२,२३७,
२६४,२७७ निर्णय लिहिले मात्र सही व शिक्काच मारले नसुन चालते क्रमांक २४५ मध्ये मालकी हक्क आदेश नसताना २३९ ते २४५ मध्ये कब्जेहक्कदार मध्ये चुकीचे नोंद केली असुन चालते क्रमांक ९ मध्ये निर्णय लिहले असूल सही शिक्क्यावर शिल्लक आहेत,तर चालू क्रमांक २७७ चे निर्णयच लिहले नाही, असे एकूण तब्बल १० चालते क्रमांकचे अभिलेख अपुर्ण ठेवून थातुरमातुर चौकशी नोंदवही व शिट क्रमांक सादर केल्याने एकुणच कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान,तत्कालीन उप अधीक्षक प्रकाश कुरवाडे यांच्या या करारनाम्याची माहिती उप संचालक भुमी अभिलेख नागपूर विभागाचे विष्णू शिंदे यांना स्थानिक प्रशासनाने कळविले असुन वरिष्ठ अधिकारी यांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

प्रकाश कुरवाडे या़ंना सुरुवातीपासुन चौकशी नोंदवही व शिट क्रमांक सादर करण्याबाबत उप अधीक्षक कार्यालय देसाईगंज यांनी पत्र पाठवून वारंवार मागणी केली आहे, चुकीच्या नोंदी दुरूस्ती करण्याबाबत त्यांना पुन्हा नोटीस बजावली असून याची दखल न घेतल्यास वरिष्ठांना तसा अहवाल सादर केला जाईल.

श्रीमती नंदा आंबेकर
प्रभारी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय गडचिरोली.