सिंचन,पर्यंटनाच्या विकासाकरीता इंजि.बडोलेंना निवडून द्या-राजेंद्र जैन

0
249

गोंदिया,दि.२६ः- सिंचन, शेती, रोजगार, पर्यटन विकास तसेच महायुती सरकारच्या जन कल्याणकारी योजना अविरत चालू ठेवण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडूण आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आपसी हेवेदावे व कोणतेही भेदभाव न बाळगता खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आपला उमेदवार बहुमताने निवडून आणण्याचा आहे.

आज साई श्रध्दा लॉन तावसी, अर्जुनी मोरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना विधानसभेत बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यासाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमूख उपस्थितीत झालेल्या बैठकीत बोलतं होते.

यावेळी बैठकीला सर्वश्री राजेंद्र जैन, राजकुमार बडोले, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे, यशवंत गणवीर, लोकपाल गहाणे, नामदेव डोंगरवार, नारायण भेंडारकर, दाणेश साखरे, उद्धव मेहंदळे, योगेश नाकाडे, मंजूषा बारसागडे, सुशीला हलमारे, सुशीला राऊत, घनश्याम मेहता, राकेश जायस्वाल, किशोर ब्राह्मणकर, आम्रपाली डोंगरवार, हर्षा राऊत, लता दृगकर, निशाताई मस्के, नागपुरे ताई, रतिराम राणे, सागर आरेकर, माधुरी पिंपळकर, चित्रलेखा मिश्रा, माधुरी बनपूरकर, अनिशा पठाण सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.