
गोंदिया,दि.२८ःराज्यात सध्या विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत असून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांना उमेदवारी जाहीर केली.त्या उमेदवारी विरोधात पक्षविरोधी कारवाई करीत पक्षशिस्त मोडल्याबद्दल काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती राजेश नंदागवळी व नुकतेच काँग्रेसमध्ये आलेले अजय लांजेवार यांचे काँग्रेस पक्षातून ६ वर्षाकरीता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरुन निष्काषन करण्यात आले आहे.प्रदेश काँग्रेसचे प्रशासन व संघटन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी यासंदर्भात पत्र काढले आहे.