महायुतीचे उमेदवार इंजि. राजकुमार बडोलेंच्या प्रचारार्थ खा.पटेल व आ.फुके रिंगणात

0
91

सडक अर्जुनी,दि.0७ : शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला–भगिनी यांच्या उज्ज्वल भविष्याच्या प्रकाशमय वाटचालीची दिशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनाम्यात दिली आहे. समाजातील सर्व घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम आम्ही करीत आहोत, या धान बहुल भागांतील धान उत्पादन शेतकऱ्यांसाठी मागील वर्षी 20 हजार बोनस दिले, यावर्षी सुध्दा हेक्टरी 25 हजार बोनस मिळवुन देवू असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल यांनी केले.

नोव्हेंबर रोजी आशीर्वाद लॉन सडक/ अर्जुनी येथे मोरगांव अर्जुनी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार इंजि.राजकुमार बडोले यांच्या निवडणूक प्रचारार्थ खा.प्रफुल पटेल व आ.परिणय फुके यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या मित्र पक्षाची संयुक्त बैठक पार पडली,त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार खोमेश रहांगडाले,जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणवीर, शेषराव गिऱ्हेपुंजे, लक्ष्मीकांत धमगाये, जितेंद्र मौर्य, रचनाताई गहाणे, तेजराम मडावी, अविनाश काशिवार, हर्ष मोदी, विलास कापगते, रजनीताई गिऱ्हेपुंजे, छायाताई चौहान, वंदना डोगरवार, कविताताई रंगारी, निशाताई तोडासे, सुधाताई रहांगडाले, चंद्रकलाताई डोंगरवार, राजेश कठाने, संगीताताई खोब्रागडे, लायकराम भेंडारकर, अशोक लंजे, रमेश चुरे, शालिंदर कापगते, चेतन वडगाये, शिवाजी गहाणे, गजानन परशुरामकर, प्रभूदास लोहिया, देवचंद तरोणे, तुकाराम राणे, शिशिर येडे, हितेश डोंगरे, गोरेश बावनकर सहित मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाऊबीजेचे औचित्य साधून खा.प्रफुल पटेल यांचे लाडक्या बहिणीनी औक्षण करून आशीर्वाद दिले तसेच महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींच्या सन्मानार्थ भाऊबीज ओवाढणी दिली व सक्षम करण्यासाठी आणलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी आभार व्यक्त केला. माझ्या बहिणींना बळ देणारी ही योजना कायम सुरू राहील असे खा.पटेल यांनी आश्वस्त केले.

गोरेगाव तालुक्यातील चिल्हाटी येथे लालचंद चव्हाण यांच्या निवास स्थान समोरील पटांगणावर सुध्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संबोधित करताना खासदार प्रफुल पटेल म्हणाले की देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास जलद गतीने होत असून कृषी, आरोग्य, गॅस, मोफत राशन जनधन योजना, उज्वला योजना यासारख्या योजनांच्या माध्यमातून देश प्रगती करीत आहे. राज्यात सुध्दा लाडली बहिण, किसान सन्मान, शेतकरी विज बिल मोफत, मुलींना निःशुल्क उच्च शिक्षण यारख्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. राज्यात व केंद्रात एकाच विचारधारेचे पक्ष सत्तेत असल्यास विकासाची गती वाढते. या क्षेत्राच्या विकासासाठी राज्यात महायुतीच्या उमेदवाराला बहुमतांनी निवडून आणा या क्षेत्राचा विकास करण्यास आम्ही मिळून जिम्मेदारी घेवू असे प्रतिपादन श्री पटेल यांनी केले.

यावेळी सर्वश्री प्रफुल पटेल, परिणय फुके, राजकुमार बडोले, हेमंत पटले, प्रेमकुमार रहांगडाले, रेखलाल टेंभरे, मनोज बोपचे, केवलभाऊ बघेले, लक्ष्मण भगत, विशाल शेंडे, सोमेश रहांगडाले, संजय बारेवार, जगदीश बावनथडे, हर्ष मोदी, कृष्णकुमार बिसेन, श्रीप्रकाश रहांगडाले, बाबा बोपचे, लालचंद चौहान, महेंद्र चौधरी, सुरेंद्र रहांगडाले, प्रतीक पारधी, विनोद रहांगडाले, चौकलाल येडे, राजेश बिसेन, रामू महारवाडे, बाबा बिसेन, बाबा बहेकार, चित्रकला चौधरी, श्रद्धा रहांगडाले, उषा रामटेके, अंकित रहांगडाले, रवींद्र पटले, रामेश्वरी रहांगडाले, गिरधारी कटरे, अनिता तुरकर, ललिता पुंडे, नितेश येल्ले, रामु हरिणखेडे, कल्पनाताई बहेकार, नलिनी बिसेन, श्याम फाये, अतुल मोटघरे, शशी ताई फुंडे, राकेश बघेले, तूषित पटले, विश्वजीत डोंगरे, माणिकभाऊ पारधी, देवचंद सोनवणे, जेडी जगनीत, झुमक भाऊ बिसेन, अविनाश भेंडारकर, माणिकभाऊ भगत, सुरेश हरिणखेडे, किशोर गौतम सहीत मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.