महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांचा केशोरी जि.प.क्षेत्रात झंझावाती प्रचार दौरा

0
81

= गावांगावात मतदारांचा प्रचंड प्रतिसाद =
अर्जुनी मोर.- अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे भारतिय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट ,राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार गट व मित्र पक्ष या महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ईंजी.राजकुमार बडोले यांनी  ता.7 रोजी आदिवासी नक्षलप्रभावीत अतिदुर्गम केशोरी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणा-या संपुर्ण गावांचा झंझावती प्रचार दौरा करून प्रत्यक्ष मतदारांच्या दारापर्यंत जावुन घडी चिन्हाची बटन दाबून भरघोष मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
या दौ-यात महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी केशोरी जि.प.क्षेत्रातील 27 गावातील मतदारांसी थेट संवाद साधत 20 नोव्हेंबर रोजी होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीतील महायुती सरकारचे ध्येय, उद्दिष्टे व विविध योजना आपनापर्यंत कशा पोहचल्या, तसेच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील विकास कामे स्थानिक प्रश्न आणि मतदारांच्या अपेक्षेचा विचार करून महायुतीच्या विकास कार्यावर भर देण्यात आला याची सविस्तर माहीती दिली.तसेच महायुतीचे विचार योजना आणी पुढे करण्यात येणारी विविध विकासात्मक कामे मार्गी लावुन या क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मला निवडुन देण्याचे आवाहन उमेदवार राजकुमार बडोले यांनी केले.
या झंझावती प्रचार दौऱ्यात मतदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतीसाद देत निवडुन देण्याची हमी दिली.मतदारांचा भरघोष प्रतीसाद बघता महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले भारावुन गेले.या दौऱ्यात भाजपा, राष्टवादी काॅग्रेस, शिवसेना शिंदे गट व मित्र पक्षातील शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.यामधे यशवंत गणवीर, लोकपाल गहाणे,किशोर तरोणे, योगेश नाकाडे,उध्दव मेहंदळे, लायकराम भेंडारकर, प्रकाश गहाणे,होमराज पुस्तोळे, गजानन कोवे,हरिश्चंद्र उईके,विजय कापगते, काशिप जमा कुरेशी, तानेश ताराम,चंद्रशेखर रामटेके,लैलेश शिवणकर, अविनाश कापगते,आम्रपाली डोंगरवार, भोजु लोगडे,नितीन नाकाडे,व्यंकट खोब्रागडे,चंद्रभान टेंभुर्णे,नाना शहारे,तेजुकला गहाणे,नंदकुमार गहाणे, सुदाम कोवे,सरपंच लोथे,विलास बोरकर,व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.