
गोंदिया, दि.8 : 64-तिरोडा विधानसभा निवडणूक मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले पोलीस निरीक्षक हसीब उर रेहमान यांनी कुल्हाडी, बाघोली, चिचगाव टोला, कटंगी येथील आठ मतदान केंद्रांना भेट दिली. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे त्याअनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी जिल्ह्याभर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. मतदान केंद्रावर निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असणे आवश्यक असल्याने हसीब उर रेहमान यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली व आवश्यक त्या सुविधा पुरविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षकांचे संपर्क अधिकारी तेजस कोंडे, पोलीस हवालदार पवार, पोलीस पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते.