41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ आरमोरीत मतदार जनागृती मोहीमेचा शुभारंभ

आरमोरीत मतदार जनागृती मोहीमेचा शुभारंभ

0
30

blank

देसाईगंज,दि.०९- फवारा चौक देसाईगंज येथे निवडणूक निर्णय अधिकारी ६७ आरमोरी कार्यालय यांचे वतीने मतदार जनागृती मोहीमेचा शुभारंभ मानसी (भा प्र से) निवडणूक निर्णय अधिकारी ६७ आरमोरी(अज) विधानसभा मतदार संघ यांचे हस्ते करण्यात आला
या प्रसंगी सामूहिक मतदार शपथ घेण्यात आली श्रीमती प्रीती डूडूलकर तहसीलदार देसाईगंज यांनी उपस्थिताना मतदानविषयी मार्गदर्शन केले हस्ताक्षर अभियान वर सर्व उपस्थितानी स्वाक्षरी करून मी मतदान करणारच याचा निर्धार केला जबाबदार गडचिरोलीकर पुढे येऊन मतदान कर या घोषवाक्यचा सेल्फी स्टैंड वर सर्वांनी फोटो चा आस्वाद घेतला
या कार्यक्रम प्रसंगी श्री रणजित यादव ( भा प्र से) उपविभागीय अधिकारी कुरखेडा प्रिती डूडूलकर तहसीलदार देसाईगंज प्रणाली खोचरे संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती देसाईगंज कुलभूषण रामटेके मुख्याधिकारी नगर परिषद देसाईगंज अजय जगताप पोलिस निरीक्षक देसाईगंज विकास शिंगटे मुख्याधिकारी नगर पंचायत कोरची तसेच सर्व कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते

blank