93 वर्षीय अनुबाई ठाकरे यांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

0
110
  • मोरगाव विधानसभा क्षेत्रात गृह मतदान

गोंदिया  दि. 9 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने 63 अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघ अंतर्गत 85 वर्षा वरील व 40 टक्केपेक्षा जास्त दिव्यांग मतदारांकरीता  विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला आज सुरुवात झाली. गिधाडी येथील रहिवासी असलेल्या 93 वर्षीय अनुबाई ठाकरे यांनी आपला गृह मतदानाचा हक्क बजावला.

गृह मतदानाचे वेळी निवडणूक निरीक्षक (सामान्य) व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन टपाली मतदान प्रक्रियेची पाहणी केली. आज दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी   अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघातील गृहभेट टपाली मतदानाचे वेळी सामान्य निरीक्षक यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी कमला महारु पांढरे वय वर्ष 86, गौरीटोला यांचे घरी भेट देऊन टपाली मतदान प्रक्रियेची पाहणी केली.

            गृह मतदाना करीता अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात 85 वर्षावरील 70  मतदार आहेत, तर 40 टक्कपेक्षा जास्त दिव्यांग असलेले 10 मतदार आहेत. गिधाडी येथील रहिवासी असलेल्या 93 वर्षीय अनुबाई ठाकरे यांनी गृह मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला. गृह मतदान घेण्याकरीता अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात 10 मतदान पथक तयार करण्यात आले आहे.