स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्हाभर महाबाईक रॅलीचे आयोजन

0
39
  • शेकडो मतदारांचा उत्स्फुर्तपणे सहभाग

गोंदिया, दि.12 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी SVEEP (Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमांतर्गत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्या नियोजनाने 11 व 13 नोव्हेंबर 2024 रोजी गोंदिया जिल्हाभर शेकडो मतदारांच्या सहभागाने महाबाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर बाईक रॅली 11 नोव्हेंबरला गोंदिया तालुक्यातील रावणवाडी गावापासून रवाना होऊन तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी मार्गे संपूर्ण जिल्हाभर फिरत अर्जुनी मोरगावला मुक्कामी पोहचली. या महाबाईक रॅलीत ठरविण्यात आलेल्या ठिकाणी स्टॉपेजला हजारोंच्या संख्येने जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील कर्मचारी व मतदार मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी कर्मचाऱ्यांकडून आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.गटविकास अधिकारी, तालुका नोडल अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्या प्रयत्नाने महाबाईक रॅली यशस्वीरित्या पूर्ण करणार आहेत.

        यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी स्वत: महाबाईक रॅलीमध्ये सहभागी होऊन लोकशाही बळकट करण्यासाठी तसेच जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील सर्व मतदारांनी येत्या 20 नोव्हेंबर रोजी आपला मतदानाचा हक्क अवश्यक बजवावा असे आवाहन केले.

        या महाबाईक रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन निवडणूक लोकशाहीच्या पर्वात सहयोग नोंदवून गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा मतदानाची टक्केवारी 75 पेक्षा जास्त वाढवून लोकशाहीला बळकट करावे असे आवाहन SVEEP नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केले.

        यावेळी उपविभागीय अधिकारी गोंदिया चंद्रभान खंडाईत, उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव वरुणकुमार शहारे, उपविभागीय अधिकारी तिरोडा पूजा गायकवाड, उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड तसेच SVEEP सहायक नोडल अधिकारी महेंद्र गजभिये, सहायक नोडल अधिकारी शिखा पिपलेवार आणि तहसीलदार महेंद्र गणवीर, तहसीलदार मोनिका कांबळे, तहसीलदार समशेर पठाण, तहसीलदार नारायण ठाकरे, तहसीलदार प्रज्ञा भोकरे, प्रदीप समरीत तालुका SVEEP नोडल अधिकारी गोंदिया, विनोद चौधरी तालुका SVEEP नोडल अधिकारी तिरोडा, स्वाती तायडे तालुका SVEEP नोडल अधिकारी, गिरीधर सिंगनजोडे तालुका SVEEP नोडल अधिकारी देवरी, डी.बी.साकुरे, जिल्हा SVEEP CELL केदार गोटेफोडे, चंद्रशेखर दमाहे, विजय लिल्हारे, सचिन धोपेकर, चंदू दुर्गे, संजय टेंभरे, मुकेश वासनिक, श्रीमती पारधीकर, श्रीमती शेट्टे, मोरेश्वर बडवाईक, आर.एस.चव्हाण, अनुप नागपुरे, नितेश मालाधारी, संजयकुमार बिसेन, हर्षकुमार पवार, नरेंद्र गौतम, उमाशंकर पारधी, दिलीप हिरापूरे, तेजलाल भगत, विलास डोंगरे, प्रमोद खोब्रागडे, कुवरलाल रहांगडाले, प्रमोद पटले उपस्थित होते.