=मोहाडी तालुक्यातील खडकी येथील घटना,परिसरात पसरली शोककळा
अर्जुनी मोर.-नुकतीच दिवाळी साजरी झाली, शाळेला सुट्टी त्यातच गोंदिया भंडारा जिल्हा हा झाडीपट्टीचा क्षेत्र म्हणून ओळखला जातो,सगळीकडे मंडई आणि नाटकांची धाम धूम सुरू आहे. अशातच दिवाळीच्या सुट्या आणि त्यात मामाच्या गावातील मंडई व नाटकाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या दोन सख्या बहीण भावांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ता.११ रोजी दुपारी १ वाजे दरम्यान मौजा खडकी ता. मोहाडी जिल्हा भंडारा येथे घडली. आणि एकच आक्रोश सुरू झाला. मृतक चिमूकलीचे नाव कुमारी दिव्यांनी राजेंद्र वाढवे वय १४ व मुलगा प्रेम राजेंद्र वाढवे वय १० वर्ष रा.बोंडगाव सूरबण ता.अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया असे आहे.
मामाच्या गावात असलेल्या मंडई व नाटकाचा आनंद घेण्यासाठी दोन्ही भावंड आपल्या आई-वडिलांसह मौजा खडकी येथे गेले. काल ता.१० रोजी गावात नाटक आणि मंडई साजरी झाली गावातील आणि घरातील ज्येष्ठ मंडळी जेवण करून जागरण असल्यानं झोपी गेली मात्र ती दोन्ही भावंड आपल्या मामाच्या मुलासह घराच्या शेजारी शेतामध्ये असलेल्या शेततळ्यातील पाणी बघण्यासाठी आणि खेळण्यासाठी गेली असता सर्वप्रथम मृतक दिव्यांनी हिचा तोल गेला ती शेततळ्यातील पाण्यात पडली आणि तिला वाचवण्यासाठी भाऊ दहा वर्षांचा चिमुकला प्रेम गेला मात्र तोही तिच्यासह शेततळ्याच्या स्वाधीन झाला उपस्थित इतर मुलांनी आरडाओरड सुरू केली. घरचे आणि गावातील लोक लगेच जमले शेततळ्यात शोधाशोध सुरू झाली मात्र तोपर्यंत दोन्ही सख्या भावंडांचा दुर्दैवी तेवढाच करून अंत झाला वेळ निघून गेली होती.अखेरीस दोन्ही चिमूकल्यांचे शवच हातात आले.
“ या घटनेची बातमी मृतक चिमुकल्यांचे स्वगावी बोंडगाव सूरबण येथे पोहोचताच संपूर्ण गावात व परीसरात शोककळा पसरली, प्रत्येक जण हळहळ व्यक्त करू लागला मृतकाचे वडील राजेंद्र प्रल्हाद वाढवे (वय ४२ वर्ष )हे भूमिहीन असून काबाकष्ट करून प्रपंच चालवतात मृतक मोठी मुलगी दिव्यांनी ही आठव्या वर्गात तर मुलगा प्रेम हा चवथ्या वर्गात शिक्षण घेत होता.दोन्ही चिमुकल्यांच्या झालेल्या या मन हेलावणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर दुखात बुडाला असून त्या दोन्ही चिमुकल्यावर उद्या सकाळी ९ वाजता त्यांच्या स्वगावी मौजा बोंडगांव सुरबन येथे अंतिम संस्कार करण्यात आले.”