लाडके उमेदवार राजकुमार बडोले यांचे प्रचार रॅलीला रात्रीपर्यंत मतदारांचा मोठा प्रतिसाद

0
157

( देवदुतच मानतात बंगाली वसाहतीतील लोक )
अर्जुनी मोर.( सुरेंद्रकुमार ठवरे ) –अर्जुनी मोरगाव विधानसभेचे महायुतीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार ईंजी.राजकुमार बडोले यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.प्रचार रॅलींना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.रात्री उशिरापर्यंत मतदार बंधु व लाडक्या बहीणी पंचारत्या धरुन ओवाळणीसाठी जागत असतात.यामुळे मतदारांमधे राजकुमार बडोले विषयी प्रचंड सहानुभुती निर्माण झाली आहे.अर्जुनी मोर.तालुक्यातील बंगाली वसाहतीतील मतदार तर बडोले साहेबांना देवदुतच मानत असल्याचे दिसुन येत आहे.
अर्जुनी मोर.विधासभा क्षेत्रात 14 नोव्हेंबर ला अर्जुनी मोर. तालुक्यातील ईटखेडा व महागांव जिल्हा परिषद क्षेत्रातील संपुर्ण गावांत झंझावती प्रचार दौरा करण्यात आला.प्रत्येक गावात ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांचे आतषबाजीत महायुतीचे उमेदवार ईंजी.राजकुमार बडोले यांचे जंगी स्वागत करण्यात आले. फुलांचा वर्षाव करीत लाडक्या बहीणींनी औक्षवंत करण्यासाठी एकच गर्दी केली होती.निवडणुक प्रचाराच्या धावपडीत कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधतांना प्रत्येक गावात पोहचण्यास उशीर होत असला तरी मतदार बंधु व लाडक्या बहीणी उमेदवार ईंजी.राजकुमार बडोले यांची वाट बघत असतात.
*बंगाली वसाहतीसाठी बडोले देवदुतच*
अर्जुनी मोर. तालुक्यात मोठ्या प्रमाणात बंगाली बांधवांची गावे आहेत.यामधे अरुणनगर, गौरनगर, दिनकरनगर, संजयनगर, पुष्षनगर 1,पुष्षनगर 2, ही गावे आहेत. काल गुरुवार 14 नोव्हेंबर ला या गावात महायुतीचे उमेदवार ईंजी.राजकुमार बडोले हे प्रचाराला गेले असता बंगाली बांधवांनी जंगी स्वागत केले .उशीर झाला असला तरी व प्रचंड थंडीतही शेकडोच्या संख्येत बंगाली बांधव व लाडक्या बहीणी आपल्या लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी सज्ज होत्या.बंगाली बांधवांच्या आदरातिथ्याने राजकुमार बडोले भारावुन गेले,यावेळी मार्गदर्शन करतांना बडोले म्हणाले की बंगाली बांधवांचे प्रेम सुरवातीपासूनच आहे.या माझ्या बंगाली बांधवांनी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पश्चिम बंगाल मधून संविधान सभेवर निवडून पाठविले होते. तेच प्रेम सन 2009 पासून अर्जुनी मोरगाव तालुक्यात असलेल्या सर्व बंगाली कॅम्प मधून मला मिळत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. या माझ्या बंगाली बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार असे आश्वासन देऊन तुमच्या या आदरातिथ्याने मी भारावून गेलो आहे. त्यामुळे 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्व बंगाली बांधव व माझ्या लाडक्या बहिणींनी घडी चिन्हाची बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन राजकुमार बडोले यांनी केले.