संविधान दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उत्साहात साजरा

0
37

गोंदिया- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदियाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रेलटोली, कार्यालय येथे व प्रशासकीय इमारत जवळील भारतीय संविधानाचे शिल्पकार, परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन संविधान दिन साजरा करण्यात आला व संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात घटना समितीने देशाला संविधान अर्पण केले. या ऐतिहासीक घटनेचे स्मरण म्हणून “संविधान दिन” साजरा करणार आला. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने सर्वश्रेष्ठ संविधान स्वीकार करीत सर्वात मोठ्या संसदीय लोकशाही राज्यप्रणालीची पायाभरणी केली. सोबतच संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुता व धर्मनिरपेक्षता ही मूल्ये आपणा सर्वांना प्रदान केली. मूलभूत अधिकारांसह कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या संविधानामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्यायाचे तसेच विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासनेच्या स्वातंत्र्याचे आश्वासन देणारे ‘भारताचे संविधान’ ही आपली गौरवशाली ओळख आहे असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

सर्वश्री राजेन्द्र जैन, नानू मुदलियार, माधुरी नासरे, केतन तुरकर, मनोहर वालदे, दिनेश जयपुरिया, नीरज उपवंशी, विनीत सहारे, नागों बंसोड़, जयंत कछवाह, प्रविन बैस, राजू एन जैन, राहुल वालदे, अनुज जैस्वाल, लखन बहेलिया, मयूर दरबार, सोनू राय, लव माटे, शैलेश वासनिक, तुषार उके, कुन्दा दोनोडे, रुचिता चौहान, संगीता माटे, सरोज कोहले, मोनिका सोनवाने, सुनीता तोमर, तापसी तोमर, रीना अग्रवाल, सरला श्रीरसागर, रेखा भोंगाडे, कपिल बावनथड़े, रौनक ठाकुर, राज शुक्ला, प्रशांत सोनपुरे, आशीष नागपुरे, वामन गेडाम, पवन सोनवाने, शरभ मिश्रा , कान्हा बघेले, भूषण पाटिल, नरेंद्र बेलगे सहित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.