गोरेगाव,२६/११-तालुक्यातील मोहाडी येतील अ दर्जा प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे आज दिनांक २६ नोव्हेंबर ला संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले प्रमुख अतिथी म्हणून मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, संस्थेचे उपाध्यक्ष जे.जे.पटले, सदस्य हिरालाल महाजन, प्रमानंद तिरेले, शिवराम मोहनकार, मुकेश येरकडे,चुळामन पटले,संदीप बिसेन आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी भारतीय संविधानाच्या उद्शिकेचे वाचन करण्यात आले
यावेळी मान्यवरांनी सांगितले की संविधान समितीने २६ नोव्हेंबरला भारतीय संविधान स्वीकूर्त केले त्यामुळे हा भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो भारताचे संविधान,भारताची राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा आहे २६ नोव्हेंबर १९४९रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संविधानाचे शिल्पकार आहेत भारतातील संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला असे प्रतिपादन केले.यावेळी कार्यक्रमाचे संचालन व आभार संस्थेचे सचिव सुभाष चौरागडे यांनी केले यावेळी गावातील नागरिक व वाचक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.