संवैधानिक अधिकारामुळे आम्ही माणूस झालो-अरविंद भावे यांचे प्रतिपादन

0
68

गोंदिया ता. २७ नोव्हेंबर :-भारतीय स्वातंत्र्यापूर्वी येथील प्रस्थापित समाजव्यवस्थेने पशुतुल्य जीवन जगण्यासाठी मजबूर केलं परंतु स्वातंत्र्य प्राप्ती नंतर भारतीय राज्यघटनेमुळे सामानतेचा अधिकार मिळाला आणि आम्ही माणूस झालो असा ठाम विश्वास सामाजिक कार्यकर्ते आणि सार्व.जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष अरविंद भावे यांनी (दि. 26) यांनी व्यक्त केला .

छोटा गोंदिया येथे, आयोजित तीन दिवसीय संविधान संमेलन कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संविधान महोत्सव समितीचे अध्यक्ष सुशील गणवीर हे होते.मंचावर जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जोंधळे, नेत्रतज्ज्ञ आणि उदघाटक डॉ अमोल जांभुळकर, ग्रामपंचायत अधिकारी पृथ्वीराज कोल्हटकर, ऍड एकता गणवीर उपस्थित होते.
श्री भावे यांनी पुढे बोलताना एक पेन आणि त्यावर असणाऱ्या कॅपचे उदाहरण देऊन म्हणाले की भारतात 85 टक्के बहुजन समाज असून 15 टक्के समाजाच्या अधिनस्त आहे यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. श्री जोंधळे म्हणाले की, भारतीय संविधानामुळे व्यक्तीचे कर्तव्य आणि अधिकाराची जाणीव झाली. डॉ जांभुळकर यांनी आपल्या उदबोधनातून सांगितलं की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मंत्र शिका, संगठीत व्हा आणि संघर्ष करा याला विसरून जाण्यासाठीचं *कटेंगे तो बटेंगे* या नाऱ्याला पुढे करण्यात आलं. त्यांनी समाजाने आळशीपणा सोडून नशामुक्त समाज निर्माण करण्याची विनंती केली.
या प्रसंगी बोलताना पृथ्वीराज कोल्हटकर यांनी, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करण्यासाठी वेदांचा अभ्यास केला परंतु त्यातून त्यांना काहीही निस्पन्न झाले नाही. निवडणूकीच्या काळात आमिषाचा जेवढा फायदा घेता येईल तेवढा अवस्य घ्या परंतु आपले स्वातंत्र्य आणि स्वाभिमान गमावू नका असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर, जणनायक बिरसा मुंडा आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. छोट्या विद्यार्थ्यांनी डान्स प्रस्तुत केले. भीमगीतांच्या बहारदार कार्यक्रमाचा आनंद उपस्थित जनसमुदायानी घेतला.हा तीन दिवसीय कार्यक्रम संविधान महोत्सव समितीचे वतीने आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष सुशील गणवीर यांनी, संचालन शिक्षक मच्छिन्द्र भेलावे यांनी तर आभार ऍड एकता गणवीर यांनी मानले.यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.