भारतीय संविधानाचे वाचन व आकलन महत्त्वपूर्ण.. रवींद्रकुमार अंबुले

0
226

तिरोडा,दि.२८ः तालुक्यातील गोंडमोहाडी येथील विविध क्षेत्रांमध्ये प्रतिष्ठित असलेल्या व्यक्तींनी एकत्रित येऊन आम्ही गोंडमोहाडीकर समूह 2016मध्ये स्थापन करून सदर समूहाच्या माध्यमातून दरवर्षी एक दिवसीय स्नेहसंमेल,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार तसेच समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेत असतात.

यावर्षीही सुद्धा 24 नोव्हेंबरला गोंडमोहाडी येथे एक दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात रवीकुमार अंबुले यांनी आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये आपण काय करायला पाहिजे व काय करू नये या संदर्भात मार्गदर्शन केले.तसेच भारत देश हा कोणत्याही धर्माच्या धर्मग्रंथानुसार चालत नसून संविधानाच्या चौकटीत राहून चालत असतो म्हणून देशातील प्रत्येक नागरिकांनी सामाजिक जीवन जगत असताना संविधानाचे वाचन व आकलन करून त्या प्रमाणे वागले पाहिजे असे सर्व नागरिकांना आवाहन केले. तसेच या देशांमध्ये बहुसंख्याक असलेल्या बहुजनांना त्यांच्या संख्येवरून त्यांना न्याय मिळत नाही त्यासाठी सगळ्या बहुजनांनी एकत्र येऊन आपल्या व समाजाच्या उद्धारासाठी एकत्रित काम केलं पाहिजे या विषयी माहिती सांगण्यात आली.1882 च्या सायमन कमिशन मध्ये महात्मा फुले केलेल्या आरक्षण मागणी पासून तर आजतागायत आरक्षण स्थिती व आपले कर्तव्य या विषयीं माहिती सांगण्यात आली.तसेच रात्रीला 7 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत या वेळेत गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी तसेच प्रबोधनासाठी गंधार संगीत गोंदिया तर्फे संदिप मेश्राम यांच्या गाणे मातृभूमीचे या कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण झाले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आम्ही गोंडमोहाडीकर समूहातील समस्त सदस्यांनी परिश्रम घेतलेले आहे.सदर कार्यक्रमाला गावातील पंचायत समिती सदस्य, गावातील पंचायत समिती सदस्य,पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, जि.प. शाळेतील शिक्षक, ग्राम विकास अधिकारी गोंडमोहळीकर समूहाचे सदस्य व इतर नागरिक, महिला भगिनी व गावातील विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.