संविधान गौरव प्रतियोगिता परीक्षा पुरस्कार वितरण व संविधान दिन कार्यक्रम उत्साहात

0
66

75वा गौरवशाली संविधान दिवस व समारोह

गोंदिया,दि.३०:– हर घर संविधान” जागृती अभियान अंतर्गत मागील ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आलेल्या संविधान गौरव प्रतियोगिता परीक्षेचे पुरस्कार वितरण कार्यक्रम तसेच संविधान दिन समारोह  विनोद मोहतुरे (सहायक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया) यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा.डॉ.दिशा गेडाम (समन्वयक संविधान जागृती अभियान), रमेश बिजेकर (शिक्षण तज्ञ), वसंत गवळी (ज्येष्ठ नागरिक), खेमेंद्र कटरे (सयोंजक ओबीसी अधिकार मंच), कैलाश भेलावे (ओबीसी सेवा संघ कृती समिती), शीतल अंबादे (मुख्याध्यापिका) यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक न्याय भवन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, संविधान मैत्री संघ व विविध सर्व सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.

या प्रसंगी अध्यक्षीय संभाषणात सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी संविधानाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असल्याचे विचार व्यक्त केले.तर उपस्थित मार्गदर्शक मंडळाने भारतीय संविधानाच्या गौरवशाली 75व्या वर्षात पदार्पण निमित्त 26 नोव्हेंबर 2024 संविधान दिन ते 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनाला भारतीय संविधानाचे अमृत महोत्सव साजरे करतो आहोत. संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टाने देश घडविण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानातील समाविष्ट स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य प्रस्थायी करायचे आहे. या मुलभूत नऊ तत्वांची वर्तमानात मोठ्या प्रमाणावर लोकजागृती, प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणात करून स्वातंत्र्य- समता- बंधुता- धर्मनिरपेक्षता या मुलभूत लोकशाही तत्व मूल्यांची जपणूक करणे, संविधान संस्कृतीला आचरणात आणून राष्ट्रनिर्मिती करिता समर्पित असणाऱ्या महापुरुषांचा वैचारिक वारसा अबाधित ठेवणे गरजेचे आहे असे सांगितले.यावेळी रमेश बिजेकर,खेमेंद्र कटरे आदींनी विचार व्यक्त केले.प्रास्तविक प्रा.दिशा गेडाम यांनी केले.

जिल्ह्यातील 8 ही तालुक्यात विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गात संविधान जागृती अभियान यशस्वी करण्यासाठी गोंदिया जिल्हास्तरीय संविधान गौरव प्रतियोगिता परीक्षा -2024 चे आयोजन मागील ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील 100 शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून करण्यात आले होते. या परीक्षेचे पुरस्कार वितरण या प्रसंगी सहायक आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले. जवळपास 7 हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेत भाग घेतले होते. 18 वर्षा खालील व 18 वर्षावरील अशा ज्युनिअर आणि सिनियरचे 2 वयोगट होते. त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे तालुकानिहाय पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

देवरी तालुका – ज्युनिअर गट जान्हवी शामल सुखदेवे, महक नरेश चंदनमलागर, कामनी राजकुमार नेताम, सिनियर गट – अंशुल संदेश लांजेवार, रिंकु सिद्धार्थ बडोले, विकेश सदाशिव बिसेन

अर्जुनी मोरगाव तालुका – ज्युनिअर गट- रज्जत तेजराम कांबळे , तुपल सौरभ शहारे, अनुज गौतम नंदेश्वर, सिनियर गट- दिपक भारत बेलखोडे, कुणाल अनिल बोरकर, आकांक्षा राजकुमार शेंडे,

सडक अर्जुनी तालुका – ज्युनिअर गट- आस्था संजय दहिवले, सुहानी पुरुषोत्तम विठोले , शुभम सुभाष पुराम, सिनियर गट- पौर्णिमा विलास बनसोड, श्वेता कुलदीप इलमकर, शीतल विलास डोमळे

सालेकसा तालुका – ज्युनिअर गट – प्राची महेश भगत, समिर नुवरलाल तुरकर, रिव्यानी विनोद वाघमारे, सिनियर गट -अर्चना केवलचंद मेश्राम, शालीनी राधेश्याम मरस्कोल्हे, प्रणिता ओमप्रकाश येळे

तिरोडा तालुका – ज्युनिअर गट उद्दोग हेमराज कोडापे, स्वप्नील अनिरुद्ध ठाकरे, तेजस्वी राजेश शेंडे, सिनियर गट रजनी राजेश बाणासुरे, रोहीणी पवन मेश्राम, सुरजलाल गुलाब कोडवती

आमगाव तालुका – ज्युनिअर गट सुरभी नन्नीलाल रहांगडाले, रेखा मनोज हरिणखेडे, वेदीका पुरुषोत्तम कटरे, सिनियर गट – मनिषा इंद्रराज बोपचे, अंजली महेश मडामे, शिल्पा रामेश्वर मेश्राम

गोरेगाव तालुका – ज्युनिअर गट -सुशिल धनराज कटरे, वैष्णवी तुलाराम जगणीत, अमन कुंवरलाल हरिणखेडे , सिनियर गट -सलोनी गुणेश्वर ठाकरे, यामिनी राजु ढोरे, सरिता संजय बारेकर

गोंदिया तालुका – ज्युनिअर गट दिव्या ऋषी चौव्हान, धनश्री झनकलाल राऊत, हेमंत गोवर्धन लाडे , सिनियर गट -शबनम आबीद अली सैय्यद, दर्शन परसराम भर्रे, प्रविण अशोक कानसकर या प्रमुख विजेत्यांसह, 130 प्रोत्साहन पुरस्कार विजेत्यांना 1.5 (दीड) लाखांचे नगद, शालेय साहित्य , स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जवळपास 200 पुरस्कार जिल्हयातील 8 ही तालुक्यात समान स्वरूपात स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रासह वितरीत करण्यात आले. विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थी, शाळा महाविद्यालय प्रशासन, पालक वर्ग सामाजिक न्याय भवन येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते.