प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा येथे 11 पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया यशस्वी

0
198

गोरेगाव,दि.०४ः- कुटुंब नियोजन कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच या कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग अधिक प्रयत्नशील व बळकट करण्यासाठी जिल्ह्यात यावर्षी सुद्धा पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवाडा 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे.मोहिमेदरम्यान गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा पुरुष नसबंदी (बिनटाका) शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यात 11 पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. सफल शस्त्रक्रिया सर्जन डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी केल्या.
शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी होण्याकरिता तालुका आरोग्य अधिकारी गोरेगाव डॉ. विनोद चव्हाण व प्राथमिक आरोग्य केंद्र चोपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन कनोजे व त्यांच्या टिमच्या उत्कृष्ट नियोजनामुळे पार पडले.
शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी होण्याकरिता तसेच लोकांना जाग्रुत करण्यास आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांनी महत्वाची भुमिका बजावली. शिबिरा प्रंसगी सर्व कर्मचार्यांचे कामाचे नियोजन जबाबदार्या सोपविण्यात आल्या.त्यात आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,स्टाफ नर्स,सामुदायिक आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहायीका,परिचर यांनी चोख भुमिका निभावली.
शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी होण्याकरिता तालुक्यातील सर्व वैद्यकिय अधिकारी,सामुदायिक आरोग्य अधिकारी,आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका व इतर कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी बजावली.
– डॉ. विनोद चव्हाण तालुका आरोग्य अधिकारी गोरेगाव

पुरुष नसबंदी (बिनटाका) शस्त्रक्रियेने पुरुषांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेत कुठलाही फरक पडत नाही , कुठलाही अशक्तपणा जाणवत नाही, माणुस पुर्वी सारखाच कष्टाचे काम करु शकतो, बिन टाक्याची शस्त्रक्रिया अत्यंत कमी वेळेची शस्त्रक्रिया आहे, शस्त्रक्रिये नंतर दवाखान्यात भरती होण्याची गरज नाही लगेच डिस्चार्ज मिळतो, कमी त्रासाची कमी वेळेची व जास्त मोबदला देणारी मिळणारी शस्त्रक्रिया असल्याने सर्व तालुक्यात अशा प्रकारच्या भव्य पुरुष नसबंदी (बिनटाका) शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
              – डॉ. नितीन वानखेडे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया