विभागीय तपासणी समितीच्या वतीने धादरी/उमरी व येगाव ग्रामपंचायतींची तपासणी

0
129

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा
गोंदिया : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2022-23 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेच्या अनुषंगाने नागपूर विभागीय तपासणी समितीच्या वतीने जिल्ह्यातील विभागीय स्पर्धेसाठी पात्र असलेल्या तिरोडा तालुक्यातील धादरी/उम तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येगाव ग्रामपंचायतींची तपासणी 5 व 6 डिसेंबर रोजी करण्यात आली.

राज्य शासनाच्या वतीने गाव स्वच्छ, सुंदर व आदर्श होण्यासाठी दरवर्षी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम राबविण्यात येते. या अनुषंगाने सन 2022-23 या वर्षात
जिल्ह्यात जिल्हापरिषद गट स्पर्धा, जिल्हास्तर स्पर्धा राबविण्यात येऊन जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येगाव ग्रामपंचायत प्रथम व तिरोडा तालुक्यातील धादरी ग्रामपंचायत द्वितीय क्रमांकावर असल्याने सदर ग्रामपंचायती विभागस्तरिय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या होत्या. त्यानुषंगाने दिनांक 5 डिसेंबर रोजी तिरोडा तालुक्यातील धादरी/ उमरी ग्रामपंचायतीची विभागीय तपासणी करण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त (आस्थापना) तसेच समिती अध्यक्ष विवेक इलमे, सहायक आयुक्त (विकास) तसेच समिती सचिव कमलकिशोर फुटाणे, अधीक्षक अभियंता तसेच समिती सदस्य श्री बेले, समिती सदस्य सहायक गटविकास अधिकारी छत्रपाल पटले, समिती सदस्य विस्तार अधिकारी अमोल महल्ले यांनी तपासणी केली. यावेळी गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे भागचंद्र रहांगडाले, विस्तार अधिकारी पंचायत शितेश पटले, विस्तार अधिकारी अनुप भावे, विस्तार अधिकारी बडोले, समूह समन्वयक अनुप रंगारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यासह इतर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
दिनांक ६ डिसेंबर रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येगाव ग्रामपंचायतीची विभागीय तपासणी करण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त (आस्थापना) तसेच समिती अध्यक्ष विवेक इलमे, सहायक आयुक्त (विकास) तसेच समिती सचिव कमलकिशोर फुटाणे, अधीक्षक अभियंता तसेच समिती सदस्य श्री बेले, समिती सदस्य सहायक गटविकास अधिकारी छत्रपाल पटले, समिती सदस्य विस्तार अधिकारी अमोल महल्ले यांनी तपासणी केली. यावेळी गटविकास अधिकारी वैद्य , जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे भागचंद्र रहांगडाले, विस्तार अधिकारी पंचायत सहारे, विस्तार अधिकारी आरोग्य मोरेश्वर धोंगडे, समूह समन्वयक सुरेश पटले यांच्यासह इतर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पाणी व स्वच्छतेच्या अनुषंगाने तपासणी करून शाळा व आंगणवाडी येथे भेट देऊन तपासणी करण्यात आली.