पुनाराम जगझापे यांना डॉ.आंबेडकर फेलोशिप

0
170

अर्जुनी मोरगाव,दि.१२- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरडटोली येथे मुख्या. पदावर कार्यरत पुनाराम नथु जगझापे यांना शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक कार्य उत्कृष्ट करत असल्याबद्दल अखिल भारतीय दलित साहित्य अकादमी न्यूदिल्ली तर्फे डॉक्टर आंबेडकर फेलोशिप देऊन गौरविण्यात आले.
पुनाराम जगझापे यांचे शैक्षणिक कार्य हे उत्तुंग असून समाजकार्यातही त्यांना खूप रस आहे. रक्तदान शिबिर, डॉक्टर आंबेडकर जयंती, संविधान दिन समारोह, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरजवंतांना नेहमी मदत करणे, स्वगावात वेगवेगळे उपक्रम राबविणे, संविधानाबद्दल मार्गदर्शन करणे, गावाच्या एकोप्यासाठी विशेष प्रयत्न करणे, गावातील विद्यार्थ्यांना बक्षीस देणे इत्यादी प्रकारचे विशेष उपक्रम राबवून समाजामध्ये आदर्श निर्माण केला आहे.याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारतीय दलित साहित्य अकादमी न्यू दिल्ली यांच्यातर्फे डॉक्टर आंबेडकर फेलोशिप माजी केंद्रीय मंत्री संघप्रिय गौतम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुमनाक्षर यांनी सर्व पुरस्कारप्राप्त कर्त्यांचे अभिनंदन करीत असेच कार्य नेहमी आपल्या हातून घडत राहावं व समाजाची प्रगती व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.पुनाराम जगझापे यांना फेलोशिप मिळाल्याबद्दल त्यांचे मित्र मंडळी ,आप्तेष्ट, गुरुवर्य आणि अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.