गोरेगाव,दि.१२ : तालुक्यातील गणखैरा (मिलटोली) येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विकास योजने अंतर्गत १० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले. या निधीतून बौद्ध वस्ती मधे रस्ता बांधकाम आणि नाली बांधकाम प्रत्येकी (५ लक्ष) करण्यात येईल. त्याचसोबत जनसुविधा योजने अंतर्गत ८ लक्ष रुपयांच्या निधीतून शमशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे देखील बांधकाम करण्यात येणार असून या कामाचे भूमीपूजन सुद्धा यावेळी संपन्न झाले. दरम्यान सरपंच अनुराग सरोजकर, ग्रामपंचायत सदस्य पुष्पराज जनबंधू, नंदकिशोर तुप्पट, हितेंद्र पारधी, गायत्रीताई मोहबे, वर्षाताई कडपत्ती, दमयंताताई सिंदूरकर,आनंद चंद्रिकापुरे, राजश्री अंगझाले, मोहन दाणी, आंचल पारधी आणि विनोद गौधरे व गावातील इतर मान्यवर उपस्थित होते.