भाकपच्यावतीने गोरेगाव तहसिलदारांना निवेदन

0
19

गोरेगांव,दि.२३ः– भारतीय कम्युनिस्ट पार्टी गोरेगाव तालुका कौन्सिल द्वारे आज दिनांक 23 डिसेंबरला तहसीलदार यांना निवेदन सादर करुन तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी राज्य कार्यकारीणी सदस्य काॅ हौसलाल रहांगडाले,काॅ दुलीचंद कावडे तालुका सहसचिव,काॅ प्रकाश डोगरे,काॅ गंगाराम भावे,काॅ देवेंद्र भावे,कॉ परेश दुरूगवार,काॅ ग्यानीराम वालदे,काॅ टेकचन्द नदेश्वर उपस्थित होते. गोरेगांव तालुक्यातील मुन्डीपार,पिंडकेपार,बोरगाव,सोनेगाव,हिरापुर, साईटोला या गावातील वन हक्क कायदा अंतर्गत प्रलबिंत प्रकरण मंजूर करुन अपील करण्याकरीता मुदत देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.