अभय योजनेत जिल्ह्यातील 8,186 वीज ग्राहकांनी केला 13.89 कोटींचा भरणा

0
38

 अभय‘ योजनेला उरले आता केवळ 5 दिवस

  • विदर्भात आतापर्यंत 26 हजार 768 वीजग्राहक सहभागी
  • नागपूर जिल्ह्यातील 8 हजार 186 ग्राहकांनी केला 13.89 कोटींचा भरणा
  • वर्धा जिल्ह्यातील 1 हजार 623 ग्राहकांनी केला 88.99 लाखाचा भरणा

 नागपूर दि. 27 डिसेंबर : – वीजबिल थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी किंवा सहा हफ्त्यात भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीज जोडणीची संधी महावितरण अभय योजनेतून उपलब्ध झाली आहे. या अभय योजनेमध्ये नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत सहभागी 8 हजार 186 वीजग्राहकांनी तब्बल 13 कोटी 89 लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा करीत राज्यात आघाडी मिळविली आहे.

या योजनेत आतापर्यंत नागपूर प्रादेशिक विभागातील 26 हजार 768 लघु व उच्चदाब थकबाकीदार ग्राहकांनी 28 कोटी 47 लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. 31 मार्च 2024 पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकित बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. या योजनेत वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकित बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरुपातील दंड माफ करण्यात येत आहे. या योजनेत मूळ बिलाच्या 30 टक्के रक्कम भरून ऊर्वरित 70 टक्के रक्कम सहा हफ्त्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळत असून एक रकमी थकित बिल भरणा-या लघुदाब ग्राहकांना 10 तर उच्चदाब ग्राहकांना 5 टक्के सवलत दिल्या जात आहे. या योजनेची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2024 पर्यंत असल्याने थकबाकी पोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या अधिकाधिक ग्राहकांनी त्यांच्याकडील थकीत वीज बिलाचा भरणा करुन या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

अभय योजनेतील लाभार्थ्यांचा जिल्हा निहाय तपशिल

जिल्हा लाभार्थी ग्राहक संख्या भरणा केलेली रक्कम (लाखात)
अकोला
1,998
213.42
बुलढाणा 4,148
367.34
वाशिम 1,504
127.08
अकोला परिमंडल 7,650 707.84
अमरावती
1,583
194.71
यवतमाळ 1,435 128.69
अमरावती परिमंडल 3018
323.4
चंद्रपूर 1307
96.51
गडचिरोली 2471
102.13
चंद्रपूर परिमंडल 3,778
198.64
भंडारा 810
40.81
गोंदीया 1,703
98.87
गोंदीया परिमंडल 2,513
139.68
नागपूर 8,186
1389.23
वर्धा 1,623 88.99
नागपूर परिमंडल 9,809 1487.22
नागपूर परिक्षेत्र 26,768 2847.22