अर्जुनी मोर.-महागाव-रोली रस्त्याचे डांबरीकरण करा-जि.प.सदस्य कविता कापगते

0
57

जि. प. अध्यक्ष व अभियंत्यांना दिले निवेदन

अर्जुनी मोर.,दि.२७ः-गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेल्या अर्जुनी मोरगाव ते निलज माहुरकुडा सिरोली महागाव रस्ता शेवटची घटका मोजत आहे. या मार्गावरून राज्य परिवहन मार्गाची बस सेवा तसेच इतर खाजगी वाहनाची सतत वर्दळ असते. मागील काही वर्षापासून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती न झाल्याने ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहने चालविणे धोक्याचे होत चालले आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील नित्यनेम रहदारीचा मार्ग असलेल्या या रस्त्यावर मजबूत डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी माहुरकुडा प्रभागाच्या जिल्हा परिषद सदस्य कविता कापगते यांनी जि.प.अध्यक्ष पकंज रहागंडाले व कार्य.अभियंता अतुल मेश्राम यांच्याकेड केली.

सदर रस्त्याचे काम सुरु न केल्यास जि.प.सदस्या कापगते यांनी उपोषणाचा इशारा आहे. तालुक्याला जोडणारा महागाव शिरोली माहूरकुडा निलज मोरगाव रस्ता विना विलंब दुरुस्त  करण्यात यावा. एक महिन्याच्या कालावधीत संबंधितांनी या रस्त्याचे बांधकाम केले नाही. तर रस्त्याच्या मागणीला घेऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य कविता कापगते यांनी निवेदनातून दिला आहे.