लाखांदूर,दि.३०ः संत तुकाराम महाराजांचे अभंग संताजी महाराजांमुळे समाजाला मिळाले,अभंगाच्या माध्यमातून संताजी व तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी मावळे तयार केलेत.सोबतच भेदाभेद, वैदिक अनिष्ट कुप्रथा, परंपरा, चालीरीती, अंधश्रद्धा यांच्यावर आपल्या अभंगाच्या माध्यमातून वार करण्याचे मोठे कार्य संताजींनी केल्याचे विचार दिघोरी (मोठी) ता.लाखांदूर येथे श्री. संताजी जगनाडे महाराजांच्या स्मृतीदिनी प्रबोधनात्मक कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून जगदिश वाडिभस्मे यांनी व्यक्त केले.
संताजींनी घाण्याचे अभंग, शंकरदीपीका, तेलसिंधु, निर्गुणाच्या लावण्या,योगाची वाट इत्यादी साहित्य लिहलेत. संतांची शिकवण हि स्वातंत्र्य,समता,बंधुता,दया,प्रेम ,विज्ञानवादी,मानवतावादी होती आणि त्या शिकवनीची आजही समाजाला आवश्यकता आहे,पण वर्तमानात संतांचे विचार मारल्या जात आहेत,असे मत जगदिश वाडिभस्मे यांनी मांडले.यावेळी गोपाल देशमुख यांनी संताजींची कौटुंबिक माहिती सांगत ओबीसी व बहुजन समाजसोबत होत असलेले षडयंत्र हे ओळखून समाजाने सावध व्हावे असे आव्हान केले.सुधाकर मोथलकर यांनी महाज्योती संस्थेच्या योजनांची माहिती दिली व त्याचा लाभ समाजाने घ्यावे असे आव्हान केले..

कार्यक्रम प्रसंगी विशेष अतिथी म्हणून माधुरीताई हुकरे (माजी जि. प.सदस्या,भंडारा),गुलाब कापसे (माजी पं. स.सदस्य,लाखांदूर),मखरू कापसे,अरुण गभने (माजी सरपंच-दिघोरी), धनराज बावनकुळे (से.नि. ग्रामविकास अधिकारी) अमरदास धंदर (ठाणेदार दिघोरी), वसंता हटवार (अध्यक्ष तं. मु.स.),सतीश आगासे (अध्यक्ष-हनुमान देवस्थान) तथा सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते आणि नगर तैलिक समाज संस्था, दिघोरीचे (मोठी) सुधीर अवचट (अध्यक्ष), मोतीराम हुकरे (उपाध्यक्ष),राजू अवचट (सचिव), नरेंद्र करंजेकार (सहसचिव), अमित गभणे (कोषाध्यक्ष) व संस्थेचे सदस्य मिलिंद करंजेकर, कोमल करंजेकर,रोहिदास देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, तुलसीदास करंजेकार, रोहित गरगळे, श्रीराम अवचट तसेच मोठ्या संख्येने गावकरी समाज बांधव,विद्यार्थी उपस्थित होते. आणि अध्यक्ष म्हणून विजय खोब्रागडे उपस्थित होते, तर संचालन रविदास देशमुख यांनी केले.