सावित्रीबाई फुले यांना महावितरणचे अभिवादन

0
13

नागपूरदि. 3 जानेवारी: – भारतातील पहिल्या शिक्षिका, भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या आणि आद्य आधुनिक विद्रोही मराठी कवयित्री सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फ़े त्यांना अभिवादन करण्यात आले.महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन येथे अधीक्षक अभियंताव्दय मंगेश वैद्य आणि राजेश नाईक यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करीत अभिवादन केले. याप्रसंगी महाव्यवस्थापक (वि व ले) अतुल राऊत, सह मुख्य औद्योगिल संबंध अधिकारी मधुसुदन मराठे, कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, उप विधी अधिकारी सुनिल उपाध्ये,  वरिष्ठ व्यवस्थापक (वि व ले) सुनिल गवई, वरिष्ठ व्यवस्थापक (मा स) डॉ. अविनाश आचार्य, प्रणाली विश्लेषक प्रविण काटोले, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर महानिर्मितीचे उप मुख्य अभियंता अंकुर जोशी, अधीक्षक अभियंता किशोर सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी, अभियंते आणि कर्मचा-यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.