सावित्रीआई फुलेंच्या जयंतीनिमित्त टेमनी येथे निशुल्क ट्युशन वर्गाचे उदघाटन

0
17

गोंदिया,दि.०५ः तालुक्यातील टेमनी येथे क्रांतीज्योती सावित्रीआई फूले यांच्या जयंती निमित्य फूले शाहू बिरसा मुंडा आंबेडकर विचार मंच टेमनी व बहुजन हिताय बहुउद्देशीय विकास संस्था टेमनी द्वारे गरजू मुला मुलीकरींता सावित्रीआई फूले सक्सेस निशुल्क ट्यूशन क्लासेसची सुरुवात करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश परिहार,फूले शाहू बिरसा मुंडा आंबेडकर विचार मंच टेमनीचे अध्यक्ष राजेश डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी सरपंच रवींद्र बिसेन,रोजगार सेवक दुर्योधन वंजारी,सामाजिक कार्यकर्तेा राजू टेकाम,ईशाताई वाघाडे(शिक्षिका),ममता मेश्राम,जयदेव डोंगरे,महेश नागपुरे,लोकेश सर्राटे,सुरेन्द्र पारधी,कमलेश ब॑सोड,सुनील ब॑सोड,मंजीत ब॑सोड प्रमुख्याने उपस्थिति होते.