गोरेगाव,दि.०५ः तालुक्यातील साईटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवारी दुपारच्या सुमारास विद्यार्थ्याच्या डोक्यावर स्लॅबचे प्लास्टर पडल्याने एक विद्यार्थी जखमी तर दोघे किरकोळ जखमी झाले होते.या घटनेची माहिती होताच जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांनी हिरापूरचे माजी सरपंच विजय बिसेन, माजी उपसरपंच भूपेश गौतम व ग्रामस्थासंह शाळेला भेट देत पाहणी केली.तसेच जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस करीत पालकांशी चर्चा करुन जिल्हा परिषदेच्यावतीने लवकरच विद्यार्थ्यासाठी बसण्याची पर्यायी व्यवस्था करुन देण्याचे आश्वासन जिल्हापरिषद सदस्य डॉ लक्ष्मण भगत यांनी दिले.