भंडारा,दि.06 : बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी, 1832 रोजी महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरु केले. हाच दिवस महाराष्ट्रात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने जिल्हा माहिती अधिकारी कायालय,जिल्हा नियोजन इमारत दुसरा माळा,भंडारा येथे मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती शैलजा वाघ-दांदळे,व संपादक मनोहर मेश्राम, यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचे विजय जाधव, बंडूसिंग राठोड, सुनिल फुलसुंगे,घनश्याम सपाटे,श्रीमती रेखा निनावे, दिलेश भुरे,सुदेश खवास या कार्यक्रमास उपस्थित होते.