नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानातील एमटीडीसी रिसॉर्टचे सात जानेवारीला ऑनलाईन लोकार्पण

0
410

= आमदार राजकुमार बडोले यांनी केली संपूर्ण रिसॉर्ट परिसराची पाहणी
अर्जुनी मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे )
नवेगाव बांध- नागझिरा व्याघ्र प्रकल्प, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, विदेशी पक्षाच्या आगमनासाठी प्रसिद्ध असलेले जलाशय यामुळे येथे वर्षभर पर्यटकाची रेलचेल असते. त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने( एमटीडीसी ) पर्यटकांच्या निवासासाठी रिसॉर्ट तयार केले. पण गेल्या आठ वर्षापासून या रिसाॅटचे लोकार्पण न झाल्याने ते तसेच धुळकात पडले होते. मात्र आता या रिसॉर्टच्या लोकार्पणाचा मुहूर्त मिळाला असून सात जानेवारीला सकाळी 11 वाजता राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण होणार असल्याची माहिती या विभागाचे लोकप्रिय आमदार राजकुमार बडोले यांनी दिली. या लोकार्पणाचे संदर्भात त्यांनी 5 जानेवारी रोजी नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानात तयार झालेल्या एमटीडीसी रिसॉर्ट परिसराची पाहणी सुद्धा केली.
नवेगाव बांध येथे व्याघ्र प्रकल्प व राष्ट्रीय उद्यान असल्याने या ठिकाणी दरवर्षी 40 ते 50 हजार पर्यंटक भेट देतात. यामध्ये विदेशातील पर्यटकांचा सुद्धा समावेश आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांची निवासाची सोय व्हावी त्यांची गैरसोय होऊ नये या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टिकोनातून शासनाने आठ वर्षापूर्वी नवेगाव बांध येथे कोट्यावधी रुपये खर्च करून एमटीडीसीच्या माध्यमातून रिसॉर्टचे बांधकाम केले होते. पण गेल्या आठ वर्षापासून त्याचे लोकार्पण न झाल्याने पर्यटकांना दुसरीकडे आसरा घ्यावा लागत होता. येथे निवासाची सोय योग्य नसल्याने पर्यटकांचा हिरमोळ होत होता. ही बाब हेरून या विभागाचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. तसेच या रिसाॅटचे लवकरात लवकर लोकार्पण करण्याची मागणी राज्याचे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे केली. त्यांनी सुद्धा याला अनुकूलता दर्शविली. येत्या सात जानेवारीला सकाळी 11 वाजता या रिसाॅटचे ऑनलाईन लोकार्पण केले जाणार असल्याचे आमदार राजकुमार बडोले यांनी सांगितले. यावेळी किशोर तरोणे ,जयंत लांजेवार, इंजि. सुनील तरोणे, राजकुमार उंदीरवाडे, पत्रकार रामदास बोरकर, सुरेंद्रकुमार ठवरे, संजीव बडोले व अन्य उपस्थित होते
*राज्याच्या पर्यटन धोरणाला नवी संजीवनी*
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानातील संजय कुटी परिसरात 16 एकर जागेत सन 2016 ला एमटीडीसीच्या माध्यमातून रिसॉर्टच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या कामाला अंदाजे 30 कोटीच्या जवळपास निधी खर्च झाल्याची माहिती आहे. या रिसॉर्ट परिसरात 18 सुट तयार करण्यात आले असून दोन समूह सूट, एक ड्रायव्हर सूट, रेस्टॉरेंट, रिकरिंग रूम, स्विमिंग पूल, जिमखाना, प्रशासकीय इमारत, तथा सभागृह तयार करण्यात आले आहे, या प्रकल्पाच्या माध्यमातून नवेगाव बांध व्याघ्र प्रकल्प आणि परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल. निसर्ग रम्य वातावरणात उभारलेल्या या रिसॉर्ट मुळे पर्यटकांना दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. सात जानेवारीला सकाळी 11 वाजता या रिसॉर्टचे ऑनलाइन लोकार्पण राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांचे हस्ते होणार असून यावेळी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले प्रामुख्याने उपस्थित राहणार असून एमटीडीसी चे वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. या लोकार्पणाच्या संदर्भाने आमदार राजकुमार बडोले यांनी पाच जानेवारी रोजी नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरातील या संपूर्ण रिसॉर्टची पाहणी करून जे काही कामे बाकी आहेत ती पूर्ण करून पर्यटकांच्या सेवेसाठी हे रिसॉर्ट सुसज्ज करावे अशा सूचना त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.