नागपूर, दि. 6 जानेवारी 2025: – केंद्राच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ निर्देशांकानुसार ग्राहक सेवा प्रदान करताना, महावितरणच्या नागपूर परिमंडलाने 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत तब्बल 73 हजार 897 लघुदाब ग्राहकांना नवीन वीज जोड दिले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात महावितरण नागपूरचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांच्या मार्गदर्शनात आणि मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात नागपूर परिमंडलात ‘इज ऑफ लिव्हींग’ या संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना तातडीने सेवा दिल्या जात आहेत.यात मागिल वर्षभरात नागपूर शहर मंडलातील 42 हजार 607, नागपूर ग्रामीण मंडलातील 19 हजार 136 आणि वर्धा मंडलातील 12 हजार 154 लघुदाब ग्राहकांना नवीन वीज जोडण्या दिल्या गेल्या आहेत.
यात नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 11 हजार 622 वीज जोडण्या या कॉग्रेसनगर विभागात तर त्याखालोखाल महाल विभागात 8 हजार 880 वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय सिव्हील लाईन्स विभागात 8 हजार 26, बुटीबोरी विभागात 7 हजार 909, गांधीबाग विभागात 6 हजार 170, मौदा विभागात 8 हजार 151, सावनेर विभागात 4 हजार 859, उमरेड विभागात 3 हजार 277, काटोल विभागात 2 हजार 849 ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय वर्धा जिल्ह्यातील वर्धा विभागात 5 हजार 439, हिंगणघाट विभागात 3 हजार 575 तर आर्वी विभागात 1 हजार 140 लघुदाब ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
या 73 हजार 897 नवीन वीज जोडण्यांमध्ये सर्वाधिक 58 हजार 63 या घरगुती वीज जोडण्या असून यात नागपूर शहर मंडलातील 35 हजार 385, नागपूर ग्रामीण मंडलातील 14 हजार 601 तर वर्धा मंडलातील 8 हजात 77 वीज जोडण्यांचा समावेश आहे. याशिवाय परिमंडलात 3 हजार 761 कृषी ग्राहकांना देखील नवीन वीज जोड देण्यात आले आहे. याशिवाय 9 हजार 51 वाणिज्यीक, 19 इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग केंद्र, 1 हजार 116 औद्योगिक ग्राहक, 55 कुक्कूटपालन केंद्र, 10 पॉवरलूम, 670 तात्पुरत्या वीज जोडण्या, 412 सार्वजनिक सेवा, 117 सार्वजनिक पाणि पुरवठा आणि 140 रस्त्यावरील दिवाबत्तींना देखिल वीज जोड देण्यात आले आहेत.
तात्काळ वीज जोड
‘महावितरण’कडून ‘इज ऑफ लिव्हिंग’ अंतर्गत नागपूर परिमंडलात नवीन वीज जोडणीसाठी आवश्यक पायाभुत सुविधा उपलब्ध असलेल्या भागात मागेल त्यास ताबडतोब नवीन वीजजोड देण्यात येत आहे. ‘महावितरणच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ चा लाभ घेत ग्राहकांनी देखील नवीन वीज जोडणी घेतल्यानंतर त्यांच्या वीज बिलांचा भरणा ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमाने नियमित करुन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
लघुदाब ग्राहकांना वर्षभरात दिलेल्या नवीन वीज जोडण्यांचा तपशील
मंडल | घरगुती ग्राहक | वाणिज्यीक ग्राहक | औद्योगिक ग्राहक | सार्वजनिक सेवा |
नागपूर शहर | 35,385 | 5,587 | 481 | 143 |
नागपूर ग्रामिण | 14,601 | 1,765 | 445 | 161 |
वर्धा | 8,077 | 1,708 | 190 | 108 |
नागपूर परिमंडल एकूण | 58,063 | 9,051 | 1,116 | 412 |