विधानसभा क्षेत्रातील विकासकामे वेळेवर करा-आमदार विजय रहांगडाले

0
101

तिरोडा,दि.०६ः- तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा घेत ती कामे तातडीने पुर्ण कर्यासंदर्भात तसेच क्षेत्रातील विविध समस्या मार्गी लावण्याकरिता जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुखांसोबत आमदार विजय रहागंडाले यांनी आढावा बैठक घेतली.यामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वेळेवर देण्याबाबत आदेश देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते व पुलाचे कामे मुदतीच्या आत करण्यात येवून दर्जेदार कामांकडे विशेष लक्ष देणे, जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्वे कामे सुरु करण्यात यावे.तिरोडा गोंदिया राष्ट्रीय महामार्ग लवकर पूर्ण करण्यात यावे, अदानी पॉवर लिमिटेड समोर मोठ्या प्रमाणात रस्ता खराब असून राखेच्या वाहतुकीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने त्वरीत दुरुस्त करण्यात यावे.इंग्रजकालीन पोंगेझरा येथे भौतिक सुविधांचा विकास करणे, निमगाव (आंबेनाला) प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे आदी महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी प्रजीत नायर,मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगंनाथम व संबधीत सर्व विभागाचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.