जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी व जानकी देवी चौरागडे हायस्कूल, कुडवा येथे होते परीक्षा केंद्र.
गोंदिया, दि.7 : लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी, आयएएस आयपीएस व इतर विविध स्पर्धा परीक्षांची तयारी आतापासूनच व्हावी या उद्देशाने ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र द्वारा राज्यस्तरीय I AM WINNER ही स्पर्धा परीक्षा दि. 5 जानेवारी ला संपूर्ण राज्यात यशस्वीरीत्या संपन्न झाली. या परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातील जवळजवळ 300 विद्यार्थी सहभागी झाले होते.
महाराष्ट्राचं उज्वल भविष्य बघणारी, महाराष्ट्राला शैक्षणिकदृष्ट्या उंचीवर घेऊन जाणारी, महाराष्ट्राला शैक्षणिक, स्पर्धात्मक गरुड झेप घेऊन जाणारी, सर्वांच्या मनामनामध्ये राज्य करणारी, राष्ट्र निर्माण करणारी, महाराष्ट्र प्रिय, मी महाराष्ट्राची महाराष्ट्र माझा असं स्वप्न महाराष्ट्र विकासासाठी घेऊन राज्यभर सर्वांच्या मनावर राज्य करणारी सर्वांची आवडती सर्वांची प्रिय असणारी परीक्षा म्हणजे आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा दि. 5 जानेवारी 2025 ला एकाच वेळी 36 जिल्ह्यातील 321 तालुक्यात 2462 केंद्रावर एक लाख 65 हजार 721 विद्यार्थ्यांची भविष्याचा वेध घेणारी विद्यार्थी प्रिय परीक्षा संपन्न झाली. देशांमध्ये सर्व स्पर्धेच्या परीक्षा मध्ये अव्वल स्थानी असल्याशिवाय राहणार नाही हे महान कार्य निस्वार्थीपणे देशपातळीवर महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी एकमेव ध्येय अकॅडमी महाराष्ट्राच्याच माध्यमातून होणार आहे. असे अकॅडमी चे संचालक अर्चना शेंडगे यांनी सांगितले आहे.
गोंदिया जिल्ह्यात दोन केंद्रावर पार पडली विनर परीक्षा… जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी व जानकीदेवी चौरागडे हायस्कूल, कुडवा या दोन केंद्रावर 300 विद्यार्थ्यांनी अतिउत्साहाने परीक्षा दिली. सदर परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी, जि.प. भारतीय विद्यालय एकोडी, टिकायतपूर, किडंगीपार, गुरुकुल कॉन्व्हेन्ट दांडेगाव, जि.प. शाळा हिरडामाली, गोंदियातील स्टार इंटरनॅशनल, गोंदिया पब्लिक स्कूल, विवेक मंदिर, शारदा कॉन्व्हेन्ट, श्री आसारामजी गुरुकुल आश्रम स्कूल, इंदिराबेन हरिहरभाई पटेल प्राथ. शाळा, लिट्ल फ्लॉवर स्कूल, सरस्वती शिशू मंदीर गोंदिया, मेरिटोरिअस पब्लिक स्कूल, तिरोडा, इत्यादी शाळांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुणकुमार बिसेन, सदस्य महेंद्र कानोजे, व इतर सदस्यगण, मुख्याध्यापक श्आर. एस. ताजने, डी. सी. हरिंनखेडे व इतर शिक्षक गण, गोंदिया येथे जांनकिदेवी चौरागडे हायस्कूल चे शिक्षक समीर तिडके, देवेंद्र भोयर, कुंभलकर मॅडम व इतर शिक्षक गण, ध्येय प्रकाशन अकॅडमी चे तालुका प्रतिनिधी श्रीमती मीनल टेंभरे यांनी विशेष सहकार्य केले. या सर्वांचे ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र चे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी वशिष्ठ खोब्रागडे यांनी आभार मानले. तसेच आय एम विनर परीक्षा 2026 करिता ऍडमिशन सुरू झाले असून पालकांनी आपल्या मुलांचे लवकरात लवकर प्रवेश करून घेण्यासाठी 9284761232/9923929763 या मोबाईल नं.वर कॉल करावा असे आवहनही वशिष्ठ खोब्रागडे यांनी केले आहे.