आमदार राजकुमार बडोले यांनी दिली पंचायत समितीला अचानक भेट

0
125

अर्जुनी मोर.( सुरेंद्रकुमार ठवरे )-राज्याचे माजी मंत्री व या विभागाचे लोकप्रिय तडफदार आमदार ईंजी.राजकुमार बडोले यांनी तारीख.6 जानेवारी ला अर्जुनी मोरगाव पंचायत समितीला अचानक भेट दिली.आमदारांच्या आकस्मिक भेटीने अधिकारी व कर्मचारी अलर्ट झाल्याचे दिसुन आले.
अर्जुनी मोरगाव विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार ईंजी.राजकुमार बडोले हे आता एँक्सन मोडवर आले असुन त्यांनी आपल्या मतदार संघातील कामकाजाला झपाट्याने सुरवात केली आहे.धार्मीक व पर्यटन विकासाला गती देणारे नेते म्हणुन ख्यातीप्राप्त असलेले आमदार बडोले यांनी जनतेची कामे पारदर्शक व सुलभरित्या व्हावे यासाठी आपले प्रयत्न सुरु केले आहेत.अर्जुनी मोरगाव तालुक्यात घरकुलांचे संदर्भात काही लाभार्थ्यांनी आमदार बडोले यांचेकडे गा-हानी मांडल्यानंतर आज तारीख.6 आमदार बडोले यांनी पं.स.ला अचानक भेट दिली.लगेच त्यांनी पंचायत समिती स्तरावरील घरकुल विभागाचा तातडीने आढावा घेतला.यामधे अत्यावश्यक लाभधारकांना प्राधान्यक्रमाने घरकुलाचा लाभ कसा देता येईल या विषयी सुचना केल्या.तसेच कोणत्याही घरकुल लाभार्थ्यांची अडवणुक होणार नाही.याची खबरदारी घेण्याची तंबी दिली.आपन जनतेच्या सेवेसाठी आहोत.हे ब्रीद लक्षात घेवुन सर्वच विभागातील कामांत पारदर्शकता आणावी असी सुचना गटविकास अधिकारी वैद्य यांना दिली.यावेळी पंचायत समितीत कामकाजासाठी आलेल्या नागरींकासोबतही आमदार राजकुमार बडोले यांनी हितगुज साधले.
ग्रामसभांना प्राधान्य द्या
ग्रामपंचायत हे गावविकासाचे मिनी मंत्रालय असते.गावातील अडीअडचणी वैयक्तिक लाभाच्या योजना ,गावातील सर्वांगीण विकासाचा आराखडा हा ग्रामसभेतुन मांडला जातो.गावाचा विकास करण्यासाठी शासन निधी, ग्रामपंचायत निधी,मग्रारोहयो हे प्रभावी माध्यम असले तरी,जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य,आमदार,व खासदार यांचीही निधी गावविकासात महत्वाची असते.अन्य लोकप्रतिनिधीनांही आपल्या कार्यक्षेत्रातील गावांतील अडचणी व विकास कसा साधता येईल किंवा प्राधान्याने कोणत्या गावांना विकास निधी देता येईल याची माहीती अवगत करण्यासाठी आमदार,खासदार,जि.प.सदस्य, पं.स.सदस्य अशा लोकप्रतिनिधींना गावात होणा-या ग्रामसभेचा पत्र पाठवावा असी सुचना आमदार राजकुमार बडोले यांनी गटविकास अधिकारी शंकर वैद्य यांना दिल्या.यावेळी जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर, माजी उपसभापती राजेश कठाणे,पं.स.उपसभापती होमराज पुस्तोळे,पं.स.सदस्य नुतनलाल सोनवाने,व्यंकट खोब्रागडे,खुशाल काशिवार,दिपंकर उके,ईश्वर खोब्रागडे,पं.स.सदस्य घनश्याम धामट व पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थीत होते