साकोली-पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवती सम्राट राजाभोज यांची जयंती वसंत पंचमीला साजरी करावी अशी ईच्छा पोवार समाजाचे राष्ट्रीय सदस्य डॉ. ओमेंद्र येळे नी व्यक्त केले.महाराष्ट्र ,मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात पोवार समाज बहुसंख्येने आहे भोज, भोजदेव,भोजराज,भोजपती, नरेंद्र यादी नावाने चक्रवती सम्राट राजाभोज यांना संबोधले जातात.
वसंत पंचमीपासून ते सल्लग दोन महिने राजाभोज जयंती साजरी केली जाते हे चुकीचे आहे, इतिहासिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या यांच्या नवीन पिढीवर वाईट परिणाम पडू शकतो राजकीय दृष्टिकोन ठेवून जयंती साजरी करणे चुकीची आहे. कार्यक्रम हा पोवार समाजाची पोवारी भाषेतूनच व्हायला पाहिजे त्यामुळे नवीन पिढीला पोवारी संस्कृती जतन करता येईल भारतात जनगणना भविष्या मध्ये पुढे होऊ शकते त्यामध्ये आपली मातृभाषा पोवारी आहे हे उल्लेख करावे त्यामुळे पोवारी भाषेला स्थान मिळेल राजाभोज जयंती प्रत्येक गावात साजरी करण्यात यावी, ज्या गावांमध्ये पवार समाजाचे एकतरी कुटुंब असेल त्या गावांमध्ये किमान पूजनतरी करण्यात यावे.
सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक प्रबोधनातून समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे अशी ईच्छा राष्ट्रीय पोवार समाज महासभेचे सदस्य डॉ. ओमेंद्र येळे यांनी व्यक्त केले.