उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण

0
425

अर्जुनी मोर.-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानाचा व्यवस्थापन कक्ष अर्जुनी मोरगाव अंतर्गत तालुक्यामध्ये सात प्रभाग संघाची स्थापना करण्यात आली. त्यापैकी संविधान प्रभाग संघ केसोरीच्या वतीने विविध उपजीविकेचे कामे व रोजगार गाव पातळीवर सुरू आहेत. या उपजीविकेसाठी व रोजगारासाठी पतपुरवठा करण्याचे काम स्थानिक को-ऑपरेटिव्ह बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आणि एचडीएफसी बँक करीत आहे.केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेअंतर्गत प्रत्येक स्वयंसहायता गटातील सदस्यांना दरवर्षी एक लाख रुपयाचे उत्पन्न मिळावे यासाठी उमेद अभियानाद्वारे मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करून उपजीविका व रोजगार करायला लावले जाते. यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. तसेच त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत होत आहे, वर्ष 2024 – 25 मध्ये संविधान प्रभाग संघ केशोरी प्रभागाच्या अंतर्गत 164 गटातील 1695 महिला सदस्यांना चार कोटी 31 लाखाचे कर्ज स्थानिक बँकेने वाटप केलेले असून पुन्हा 40 गटातील महिलांचे प्रस्ताव बँकेत सादर केलेले आहेत. या कर्जाच्या माध्यमातून विविध उपजीविकेचे साधनांना चालना मिळाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मृगनाथन आणि प्रकल्प संचालिका सौ प्रमिला जाखलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र रहांगडाले, तालुका अभियान व्यवस्थापक रेशीम नेवारे, नागेश्वर कटरे, जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन तसेच संविधान प्रभाग संघातील अध्यक्ष सौ प्रतिमाताई शेंडे, सचिव शीलाताई शिक्रामे, कोषाध्यक्ष चंदाताई तिडके सर्व सदस्य गण यांच्या सूचनेनुसार प्रभाग समन्वयक कुमारी सीमा वालदे ,प्रभाग संघ व्यवस्थापक पुष्पा कराडे, कृषी व्यवस्थापक विलास बोरकर, केशव डोंगरवार, गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव बँकेचे शाखा व्यवस्थापक खुणे तसेच युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक बडोले साहेब, तसेच मनीषा सहारे, सोनू किंचक, मयुरी काळे व सर्व प्रभागातील प्रेरिका, बँक सखी, वित्तीय सखी या सर्वांच्या मदतीने ग्रामीण भागातील महिलांना रोजगार निर्मितीसाठी मदत होत आहे.