सिरेगावबांध गंगेझरी तलावावर यात्रा व दांडिया स्पर्धा 14 जानेवारीला

0
126

अर्जुनी मोर. -जय गंगेझरी तलाव सिरेगावबांध येथे मकरसंक्रांतीनिमीत्त 14 जानेवारीला भव्य यात्रा, महाप्रसाद व सकाळी 11 वाजेपासून  दांडिया गृप स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.सिरेगावबांध येथील माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच इंजी.हेमकृष्ण संग्रामे यांचे कुशल मार्गदर्शनात निसर्गरम्य गंगेझरी तलावावर दरवर्षीच महायात्रेचे आयोजन करण्यात येते.यावर्षीही यात्रा,महाप्रसाद व दांडिया गृप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यामधे दहा हजाराचे प्रथम बक्षिस,सात हजार द्वितीय बक्षिस,पाच हजार तृतीय बक्षिस,तर दोन हजार पाचसे तृतिय बक्षिस ठेवण्यात आले आहे. तर स्पर्धेत सहभागी गृपना प्रोत्साहनपर एक हजाराचे बक्षिस देण्यात येणार आहे.यावेळी मंदिराचे पुजारी बुध्दीदास महाराज यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजकुमार बडोले यांचे हस्ते,माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे अध्यक्षतेखाली,जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणवीर, जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर, रचनाताई गहाणे,कृऊबा सभापती यशवंत परशुरामकर, प्रमोद लांजेवार,पं.स.उपसभापती होमराज पुस्तोळे,सरपंच सागरताई चिमणकर, उपसरपंच इंजी.हेमकृष्ण संग्रामे,व अन्य मान्यवर यांची प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गंगेझरी तीर्थस्थळ व पर्यटन मित्र कमिटीचे वतीने करण्यात आले आहे.