गोंदिया,दि.११ः-लसीकरण हे बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी साधन आहे.सर्व आजारांवर लढण्यासाठी बाळाला जन्मापासूनच वेगवेगळ्या वयोगटात लसीकरण दिल्यास रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक शक्ती निर्माण होते.त्यामुळे पालकांनी आपल्या बालकास जवळच्या आशांमार्फत लसीकरण सत्रात जावुन लसीकरण करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी केले आहे.आरोग्य विभागामार्फत गावपातळीवर प्रत्येक गावात लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येते.लोकांनी जबाबदारीने आपले बालकांचे संपुर्ण लसीकरण शासकिय रुग़्णालयात करुन आपल्या बालकास कुपोषण व गंभीर आजाराविरुद्ध लढण्यासाठी लागणारे प्रतिकार शक्ती निर्माण करावे.नागरिकांनी बालकास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावुन मोफत लसीकरण करुन घ्यावे.तसेच बाळाला जन्मतः स्तनपान व बिसीजी,पोलिओ,हिपॅटायटीस-बी,व्
प्रसूती झाल्यानंतर 24 तासाच्या आत बाळाला हिपॅटायटीस-बी लसीकरण देणे आवश्यक आहे.जिल्ह्यातील सर्व सरकारी आरोग्य संस्थेमध्ये प्रसुती झाल्यानंतर बाळाला हे लसीकरण देण्यात येत असुन खाजगी नर्सिंग रुग्णालयात प्रसूती झाल्यावर बालकास हिपॅटायटीस-बी लसीकरण सुद्धा अवश्य करुन घेण्याचे आवाहन सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी केले आहे.
जिल्ह्यात सर्व शासकिय आरोग्य संस्थेत बीसीजी,हिपॅटायटीस-बी,पोलिओ,पें
गेल्या दोन दशकांमध्ये, भारताने आरोग्यविषयक परिणामांमध्ये, विशेषतः बाल आरोग्य आणि लसीकरणात लक्षणीय सुधारणा केली आहे. 2014 मध्ये देश पोलिओमुक्त असल्याचे प्रमाणित करण्यात आले आणि 2015 मध्ये माता आणि नवजात टिटॅनसचे उच्चाटन करण्यात आले आहे.गोवर-रुबेला, न्यूमोकोकल कॉन्ज्युगेट लस (पीसीव्ही) आणि रोटाव्हायरस लस (आरव्हीव्ही) यासह नवीन लसींचा देशव्यापी परिचय आणि विस्तार करण्यात आला आहे.
लसीकरण ही प्राथमिक आरोग्य सेवेची गुरुकिल्ली आहे. संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नियंत्रणासाठी लस देखील महत्त्वपूर्ण आहेत.
प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी सर्वतोपरी काळजी घ्यायची असते. मूल आजारी पडू नये, यासाठी ते काहीही करायला तयार असतात. मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी लहानपणी होणाऱ्या आजारांवरील लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असते.लसीकरण हा सार्वजनिक आरोग्यक्षेत्रातील सर्वात स्वस्त उपाय आहे. कारण लसीकरणामुळे संभाव्य व्यंग व मृत्यू यांना थेट व परिणामकारक प्रतिबंध करता येऊ शकतो.
मुलांना लस देण्यास घेऊन जाताना पूर्वीचे अहवाल घेऊन जावेत. काहीवेळा मुलांना देण्यात येणाऱ्या लसीची अॅलर्जी असू शकते. कोणत्याही लसीचे बहुधा गंभीर परिणाम होत नाहीत. लसीनंतर काही विपरित परिणाम व्हायचा असेल, तर तो काही मिनिटांपासून ते काही तासांच्या कालावधीत होतो.त्यामुळे लसीकरणानंतर किमान अर्धा तास लसीकरणाच्या ठिकाणी थांबणे आवश्यक असते.अॅलर्जीचा परिणाम झाला, तर श्वसनास त्रास होणे, भोवळ येणे, ओठ, घसा यांना सूज येणे, त्वचेवर लाल चट्टे उठणे, हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, घसा बसणे, धाप लागणे अशी लक्षणे असतात. यापैकी कोणतेही लक्षण दिसले, तर लगेचच डॉक्टरकडे जावे.
लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्त्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा व अत्यंत सोपा असा मार्ग आहे.एक वर्षांच्या आत बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे.
- बाळ जन्माला आल्यानंतर वेळेवर लसीकरण केले पाहिजे. म्हणजे अनेक आजारांपासून त्याचे संरक्षण होऊ शकते. एक वर्षांच्या आत क्षयरोगप्रतिबंधक लस, त्रिगुणी लस, पोलियोप्रतिबंधक डोस, गोवराची लस या लसी द्यायला पाहिजेत.
- क्षयरोगप्रतिबंधक लसीला बी.सी.जी.लस म्हणतात.बाळ जन्मल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीसुद्धा दवाखान्यात ही लस टोचतात. १५ दिवसांनी त्या जागी एक फोड येतो तो फुटून त्या ठिकाणी थोडासा व्रण एक ते दीड महिन्याने दिसू लागतो. जन्मल्यानंतर लगेच ही लस टोचली नसल्यास पुढील ३-४ महिन्यांत कधीही टोचून घ्यावी. या लसीमुळे क्षयरोगापासून संरक्षण मिळते.
- बाळ दीड महिन्याचे झाले की त्याला त्रिगुणी लस टोचली पाहिजे व पुढे दर महिन्याने आणखी दोनदा टोचली पाहिजे.या लसीमुळे घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वात यापासून संरक्षण मिळते. दीड ते दोन वर्षांनी आणखी एक बूस्टर डोस पुन्हा द्यावा.
- बाळ जन्माला आल्यावर लगेच झिरो पोलियो डोस देतात.त्रिगुणी लसीबरोबरच म्हणजे बाळ दीड महिन्याचे झाल्यावर त्याला पोलियोप्रतिबंधक लसीचा पहिला डोस पाजावा लागतो व आणखी दोन डोस महिन्याच्या अंतराने पाजावेत. पोलियोपासून संरक्षण मिळते. दीड ते दोन वर्षांने आणखी एक बूस्टर डोस द्यावा लागतो व पाचव्या वर्षी पुन्हा एक बूस्टर डोस द्यावा लागतो.
- गोवर हा लहान वयात होणारा धोकादायक आजार आहे. त्यासाठी गोवरप्रतिबंधक लस बाळाला ९ ते १२ महिन्यांपर्यंत टोचतात. त्यामुळे गोवरपासून संरक्षण होण्यास मदत होते.
- जर काही कारणास्तव बालक लसीकरणापासुन वंचित राहिला असल्यास वयोमानानुसार शिल्लक लसीकरण वर्षभरात पुर्ण करुन घ्यावे.ह्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांचे सल्ल्यानुसार लसीकरण करावे.
अत्याधुनिक लसीकरण तंत्रज्ञानाचे फायदे-
- लसीकरण कार्यक्रम यु-विन पोर्टलद्वारे देखरेख होत आहे.
- शितसाखळी ई-विन कार्यप्रणालीमुळे दररोज तापमान देखरेख होत असल्यामुळे लाभार्थ्याला सुरक्षित लस मिळत आहे.
- लाभार्थ्याला कुठल्याही ठिकाणी लसीकरण होऊन संगणकीय प्रमाणपत्र मिळत आहे.