गोंदिया – सुप्रीम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गोंदिया द्वारा व प्रशांत (बिट्टू) सोनपुरे यांनी आयोजित शीतला माता मंदिर, गौतम नगर बाजपेयी वॉर्ड गोंदिया येथे निःशुल्क भव्य रोगनिदान शिबिर व रक्तदान प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजेंद्र जैन यांनी उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले.
शिबिरामध्ये हृदयरोग, मधुमेह, किडनी रोग, ब्रेन संबंधी समस्या, हड्डी रोग, बाल रोग, अस्थमा यासह अनेक रोगांची निःशुल्क तपासणी सुप्रीम सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल डॉ.पुष्पराज गिरी, डॉ. वज्रा गिरी, डॉ. निखिल गजभिये, डॉ.किसन टकरानी, डॉ. विवेक हरीणखेडे, डॉ. रणजीत खरोले, डॉ. निकिता कनोजे, डॉ.आनंद कटरे, डॉ. रिषभ बिश्वास, डॉ. धर्मेंद्र टेंबरे, डॉ. कुणाल बोपचे, डॉ. रितेश कटरे, डॉ.दीपक हरीणखेडे, डॉ. कार्तिक हिंदुजा, डॉ आस्था ठाकुर, डॉ. निहाल गोंधले, डॉ.विनय अंबुले सह डॉक्टरच्या चमुने शेकडो नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली व डॉ अंनामेरी, जागृती पटले, हिमानी मेश्राम, मोहिनी नागरिकर, प्रतीक बन्सोड, अंकित चव्हाण सह सहकारी चमूचे रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यात सहकार्य लाभले.
यावेळी राजेंद्र जैन, नानू मुदलियार, केतन तुरकर, प्रशांत सोनपुरे, सुधीर भाऊ कायरकर, श्यामलाल येरपुडे, रोशन बिसेन, हेमंत बडोले, चंद्रमणी गजभिये, आकाश मटाले, सुधीर ढोमने, सुनील पटले, रौनक ठाकूर, अमित बोरकर, सुनील खोगल, प्रशांत नागोसे, सौरभ काळे, मंगेश बागडे, प्रशांत बोरकर सहित मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.