अर्जुनी मोर,दि.१४ः- गेल्ा दहा वर्षापासून काव्यलेखनाचे छंद जोपासत मराठीचे शिलेदार समुहातून प्रकाश झोतात आलेले कविवर्य चंदू डोंगरवार यांना नुकतेच साई नगरी शिर्डी येथे साई कला गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात “साई कला गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025″ने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री चित्रा दिक्षित व मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सिनेस्टार प्रसिद्ध अभिनेत्री चित्रा दिक्षित, अभिनेता राजेश काळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदाम संसारे, प्रमुख अतिथी उद्योगपती किशोर सेठ कालडा, उपाध्यक्षा सौ. वंदना गव्हाणे , विशेष अतिथी प्रा. संजय मोरे, दिग्दर्शक पांडुरंग गोरे, डाॅ.अजय वारुळे यांचे उपस्थित हा दिमाखदार साई कला गुणगौरव समाजभूषण सोहळा शिर्डी येथे पार पडला.
राष्ट्रीय पातळीवरील साई कला गुणगौरव व समाजभूषण सोहळ्यात विविध क्षेत्रातील 185 मान्यवरांचा त्यांचे कला गुणांचे आधारे फेटा, शाल, ट्राॅफी , ओम साई विकास प्रतिष्ठान आणि बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शनचे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले. या कार्यक्रमात कलाकारांनी जादूचे प्रयोग, लावणी नृत्य, कथ्थक नृत्य, गीत गायन, घाणांद्रियाने बासरी वादन सादर करून रसिकांची मने जिंकली.साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, योगदान आणि साहित्य सेवेबद्दल चंदू डोंगरवार यांना साहित्य गंध, साहित्य रत्न, साहित्य दर्पण, काव्यभूषण या पुरस्कारानंतर राष्ट्रीय पातळीवरील मानाचा व अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार मिळाल्याने त्यांचे विविध स्तरांवर कौतूक, अभिनंदन आणि पुढील वाटचालीस चहूबाजूंनी शुभेच्छा वर्षाव होत आहेत.