जिल्हा नियोजन समिती सदस्याकरीता 20 जानेवारी पासून नामनिर्देशन,११ फेब्रुवारीला मतदान

0
359

पावणे तीन वर्षानंतर जिल्हा परिषद सदस्य जाणार जिल्हा नियोजन समितीवर

गोंदिया, दि.17 : महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (निवडणूक) नियम 1999 मधील तरतुदी नुसार “जिल्हा नियोजन समिती गोंदिया” या समितीवरील जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडूण आलेल्या सदस्यांमधून, जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवडणूक घेण्यासंदर्भात प्रस्तावित “नमुना एक-अ” मध्ये नमुद केल्याप्रमाणे दिनांक 20 जानेवारी 2025 ते दिनांक 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीत निवडणूक घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

            गोंदिया जिल्हा नियोजन समिती (ग्रामिण निर्वाचन क्षेत्र) निवडणूक 2025 च्या मान्यता प्राप्त “नमुना एक-अ” नुसार दिनांक 20 जानेवारी 2025 (सोमवार) ते दिनांक 23 जानेवारी 2025 (गुरूवार) रोजी सकाळी 11 वाजता पासून दुपारी 3 वाजता पर्यंत नामनिर्देशपत्रे जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे नियोजन समितीच्या कार्यालयास दाखल करता येणार आहे. दिनांक 11 फेब्रुवारी 2025 (मंगळवार) रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत या वेळेत असल्यास मतदान घेण्यात येईल.

               निवडणूकीचा दिनांक निहाय सविस्तर कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया, जिल्हा परिषद कार्यालय गोंदिया, जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालय, सर्व नगर परिषद/नगरपंचायत कार्यालयात माहितीकरीता प्रसिध्द करण्यात आलेली आहे. असे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.