गडचिरोली-राज्य सरकाराच्या वतीने युवकांमध्ये कौश्यल विकसित करण्याकरीता, मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत राज्यातील युवकांना 6 महिन्याचे प्रशिक्षण म्हणून विविध शासकीय कार्यालयात मानधन तत्वावर कामावर सामावून घेतले, या युवकांचा सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून आता सहा महिन्या नंत्तर पुढे काय? असा प्रश्न चिन्ह युवा प्रशिक्षनार्थी समोर पडला असून, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षनार्थी, गडचिरोली जिल्हा संघटनेच्या वतीने, प्रशिक्षनार्थीना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या प्रमुख मागणीला घेऊन, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे मूक मोर्चा काढण्यात आला.
या मूक मोर्चात उपस्थिती राहून युवकांना मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्ष नेहमी युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणारा पक्ष असून प्रशिक्षनार्थीना न्याय मिळवून देण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी नेहमी युवकांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणार असा विश्वास उपस्थित युवकांना दिला.या मोर्चात गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सुद्धा उपस्थिती राहून मार्गदर्शन केले.
विविध मागण्यांना घेऊन काढण्यात आलेल्या मूक मोर्चास माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सहसचिव ऍड. विश्वजीत कोवसे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, सुनील चडगुलवार, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले आझाद समाज पार्टी चे धरमानंद मेश्राम, राज बनसोड सह मोठ्या संख्येने तरुण तरुणी उपस्थित होते.