गोंदिया, दि.21 :- अनुसूचित जाती उपयोजना 2024-25 अंतर्गत सामाजिक न्याय विभागाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या चित्ररथास आज जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.
गोंदिया जिल्ह्यातील 8 तालुक्यातील गावांमध्ये चित्ररथाद्वारे अनुसूचित जाती उपायोजनेतर्गत शासनाच्या योजनांची जनजागृती करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी प्रजीत नायर, जिल्हा कोषागार अधिकारी समीर देशमुख, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, अप्पर कोषागार अधिकारी शेगांवकर, उपसंपादक कैलाश गजभिये, धम्मदीप बोरकर, तुषार उरकांदे, संदीप पटले, राकेश नानोटे, अनुप कोचे, राजू पटले यांची उपस्थिती होती.