गोरेगाव,दि.21- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम यांनी सोमवारी गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडा व आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कवलेवाडा ह्या दोन्ही आरोग्य संस्थाना आकस्मिक भेट देवुन आरोग्य संस्थेत देत असलेल्या आरोग्य सेवा व सुविधाची पाहणी केली.
भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता,बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) दरम्यानच्या वेळेत मिळत असलेल्या रुग्ण सुविधा, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे नियमित गावनिहाय भेटीचे नियोजन,पर्यवेक्षांनी उपकेंद्रांना भेटी, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा,औषधी साठा,शासकिय निवास्थान ई.विविध बाबींचा आढावा घेवुन मुख्यालय राहणे,रुग्णसुविधा गुणवत्तापुर्वक देणे,सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात यावी,कर्मचारी यांनी कर्तव्यस्थानी ओळखपत्र व ड्रेस कोड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,आरोग्य संस्थाचे रेकॉर्ड अद्यावत करुन मुख्यालयी राहण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. एकंदरीत दोन्ही आरोग्य संस्थेत अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फत देण्यात येणार्या आरोग्य सेवा बाबत समाधान व्यक्त करुन कौतुक केले.
भेटि दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.स्नेहा भावे,फार्मासिस्ट पराग साळवे,आरोग्य सहायिका दुर्गा रहमतकर,आरोग्य सेविका श्रुष्टी शहारे,कनिष्ठ सहायक टोपेश्वर रहांगडाले,परिचर जी.डी.गोटाफोडे तसेच आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेविका उपस्थित होते.