कृषी विभागाच्या बंधाऱ्याला भगदाड

0
6

मुल्ला गावाजवळील बंधारा वाहून जाण्याचा धोका

देवरी- तालुक्यातील मुल्ला-लोहारा गावादरम्यान वाहणाऱ्या कृषी विभागाच्या बंधाऱ्याला मोठे भगदाड पडले आहे. या बंधाऱ्याची वेळीच दुरुस्ती करण्यात आली नाही, तर हा बंधारा पुराच्या पाण्याने वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, लगतच्या शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.
सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील मुल्ला व लोहारा गावादरम्यान कृषी विभागामार्फत भुताई नाल्यावर सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम गेल्या पाच-सहा वर्षापूर्वी करण्यात आले होते. या बंधाèयाचे काम दर्जेदार न झाल्याने हा बंधारा आधीसुद्धा लिकेज होता, अशी माहिती नजीकच्या शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळे या बंधाऱ्याची दुरुस्ती करून लिकेज दूर करण्यात आला. पण या बंधाऱ्याच्या qवग्सशेजारी झालेल्या बांधकामावर लक्ष न दिल्याने यावर्षी पहिल्याच पाण्यात त्याला मोठे भगदाड पडले असून तो भगदाड दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
या बंधाऱ्याला पडलेल्या भगदाडाची दुरुस्ती वेळीच केली गेली नाही तर संपूर्ण बंधारा वाहून जाण्याची भीती नीलकंठ हेमणे या शेतकऱ्याने व्यक्त केली. असे झाले तर लगतच्या शेतकऱ्याची शेती वाहून जाण्याची सुद्धा शक्यता आहे. परिणामी, या बंधाऱ्याची दुरुस्ती कृषी विभागाने तातडीने करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.