ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा-प्राचार्य तायवाडे

0
13

राष्ट्रीय ओबीसी महासंघाची पत्रपरिषदेत मागणी : महाअधिवेशन ७ ऑगस्टला
27 जुर्लेच्या शाळा महाविद्यालय बंदला ओबीसी महासंघाचे समर्थन

नागपूर,दि.24 : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने येत्या ७ ऑगस्टला नागपुरात ओबीसी महाअधिवेशन होऊ घातले आहे. या अधिवेशनात मंडल आयोग लागू करून २६ वर्षे झाली असताना या आयोगाचा ओबीसी समाजाला हवा तसा लाभ झाला नाही. ओबीसींची जातीनिहाय जनगणना जाहीर करण्यात आली नाही. सर्वाधिक आत्महत्यांमध्ये ओबीसी शेतकर्‍यांचा समावेश आहे. या विषयांसह विद्यार्थ्यांना १00 टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी, प्रत्येक जिलत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह स्थापन करण्यात यावे, बार्टीच्या तत्त्वावर भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात यावी, आदी मागण्यांवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने आयोजित अधिवेशनात चर्चा केली जाईल, असे महासंघाचे संयोजक डॉ. बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
महाअधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी(दि.23) बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर डॉ. तायवाडे यांनी टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत महाधिवेशनाच्या तयारीची माहिती दिली. ओबीसी प्रवर्गातील संघटनांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न महासंघाने चालविला आहे. जास्तीतजास्त ओबीसी तरुणांना यात सहभागी करून संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.शिष्यवृत्तीची रक्कम न मिळाल्याने लोकेश येरणे सारख्या ओबीसी विद्यार्थ्याला आत्महत्या करावी लागली.आधीच 96 टक्के ओबीसी शेतकरी कर्जापायी आत्महत्या करीत असतांना त्यांना मदत करायला सरकारकडे पैसा नाही,परंतु बँकना विलिनीकरता आणि धनाढ्य उद्योगपतींनी बुडविलेल्या कर्जाला माफ करुन त्यांना देण्याकरीता पैसे सरकारकडे आहेत ही भूमिका योग्य नाही.जेव्हापासून केंद्रात नरेंद्र मोंदी यांचे सरकार आले,तेव्हापासून ओबीसी खच्चीकरणाचे काम वेगाने सुरु झाल्याचेही कडू यांनी सांगितले.फ्री शिफ शिष्यवृत्ती आणि भारत सरकारची शिष्यवृत्ती दोन्ही वेगळ्या असून फ्रीशीपसाठीची मर्यादा ही क्रिमिलेयरच्या मर्यादेत राहील असा उल्लेख असताना राज्यसरकार मात्र टाळाटाळ करीत आहे.त्यातच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री क्रीमिलेयरच्याबाबतीत ओबीसी समाजाची दिशाभूल करीत असल्याचे सचिन राजूरकर यांनी यावेळी सांगितले.यावेळी 27 जुर्लेरोजी आयोजित शिष्यवृत्तीकरीता शाळा महाविद्यालय बंद ला ओबीसी महासंघाचे समर्थन असल्याचेही प्रा.तायवाडे यांनी जाहिर केले.
धनवटे नॅशनल कॉलेजच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात ७ ऑगस्टला सकाळी १0 वाजता माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद््घाटन होईल. यावेळी प्रा. या.वा. वडस्कर, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, खासदार रामदास तडस, खा. नाना पटोले, खा. राजीव सातव, आमदार सुनील केदार, आ. रवी राणा प्रामुख्याने उपस्थित राहतील. समारोपीय कार्यक्रमात ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एम्प्लॉईज असोसिएशन, चेन्नईचे जी. करुणानिधी यांच्यासह राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आमदार जितेंद्र आव्हाड, आ. बच्चू कडू, आ. विजय रहांगडाले, आ. बाळू धानोरकर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी बहुजन ओबीसी चळवळीतील नागेश चौधरी, माजी मंत्री सुधाकर गणगणे, प्रा. मा.म. देशमुख व बबनराव फंड यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे डॉ. तायवाडे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जेमिनी कडू,सचिन राजूरकर, शेषराव येलेकर,खेमेंद्र कटरे, बबनराव फंड,गुणेश्‍वर आरीकर,मनोज चव्हाण,सुषमा भड,निकेश पिणे, भूषण दडवे, विजय अहिरे, रमेश गिरडकर, संजय भिलकर,विनोद उलीपवार निवृत्त डीसीपी यशवंत कुथे,कृष्णा देवासे,सावन डोये,गोविंद वरवाडे आदी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.