सडक/अर्जुनी- प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापनदिन अर्जुनी मोर विधानसभेचे आमदार ईंजी.राजकुमार बडोले यांचे सडक / अर्जुनी येथील जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम राष्टपिता महात्मा गांधी, भारतिय संविधानाचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतीमेला माल्यार्पण करून आमदार ईंजी.राजकुमार बडोले यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 26 जानेवारी 1950 रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य, 26 जानेवारी या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला,अशी माहिती यावेळी आमदार राजकुमार बडोले यांनी उपस्थितांना दिली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अविनाश काशिवार, माजी सभापती अशोक लंजे, जिल्हा सचिव शेषराव गिरीपुंजे, माजी जिल्हा परिषद सदस्य मिलन राऊत, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकलाताई डोंगरवार, माजी सभापती गिरधारी हत्तीमारे ,तथा जागेश्वर पातोडे ,लोकचंद कापगते, हितेश डोंगरे, राजेश कठाने, विलास बागडकर, शितल गौर, राजेश शहारे, ताराबाई मडावी ,बोरकर ताई, उमेश पंधरे, प्रशांत शहारे, विलास कापगते ,मोहसीन सोनवाणे, सोनू भेंडारकर, प्रतिश शेंडे, जगदीश सरनागत, तथा भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस तथा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते